अखेर अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेले अनेक दिवस अशोक चव्हाण लढणार नाहीत, त्यांची पत्नी अमिता लढणार अशा बातम्या येत असताना शनिवारी रात्री काँग्रेसची आठवी यादी जाहीर करण्यात आली. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची नांदेडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

त्याचबरोबर या यादीत मल्लिकार्जुन खरगे (गुलबर्गा), एन. वीरप्पा मोईली (चिकबल्लापूर) आदी ज्येष्ठ नेत्यांचीही नावे आहेत.

काँग्रेसने शनिवारी रात्री जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातील एका नावाबरोबरच कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेशातील उमेदवारांचीही नावे आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या आता २१८ वर गेली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us