अशोक सराफ यांचे ‘हे’ नविन नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला

मुंबई : वृत्तसंस्था – नविन वर्षात अनेक चित्रपटांसह अनेक दर्जेदार मराठी नाटकही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ यांच्या व्हॅक्यूम क्लीनर नावाच्या नाटकाचे पोस्टर नुकचेत सोशल मीडियावर आऊट झाले आहे.  हे नवे  नाटक लवकरच  रसिकांच्या भेटीला येते आहे.
या नाटकात अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असल्याचे पोस्टरवरुन समजतेय. या नाटकाचे दिग्दर्शन आणि लेखन चिन्मय मांडेलकर यांनी केले आहे. तर निर्मिती निवेदिता सराफ यांनी केलीय.
काही दिवसांपूर्वी प्रसाद ओक, निखिल राऊत आणि चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकसंबंधीत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या पोस्टमध्ये व्हॅक्यूम क्लीनर नावाचा हॅशटॅग क्रिएट करण्यात आला होता. मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेली अनेक मंडळी हेची पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याने या प्रोजेक्टचे नाव व्हॅक्यूम क्लीनर नावाशी संबंधित असल्याचा तर्क तेव्हाच लावण्यात आला होता.
Loading...
You might also like