राज्यात ‘या’ ठिकाणी तलावातील गाळ काढताना सापडले विमानाचे अवशेष

आष्टी : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रुटी इमनगाव येथील तळ्यामध्ये गाळ काढत असताना ७९ वर्षापूर्वी अपघातग्रस्त झालेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. आष्टी शहरापासून जवळच असलेल्या रुटी इमनगाव येथील प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. गाळ काढत असताना हे अवशेष सापडले.

आष्टी तालुक्यात मागील वर्षी कमी पाऊस पडला होता. त्यामुळे रुटी इमनागव तळ्यातील पाणी आटले आहे. या तळ्यातील गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरु आहे. आज या ठिकाणी काम सुरु असताना विमानाचे अवशेष सापडले. विमानाचे अवशेष सापडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. रुटी इमनागव प्रकल्प हा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून सध्या या प्रकल्पात पाणी नसल्याने कोरडा पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळ्यात सापडलेले विमानाचे अवशेष हे १९४० सालच्या एका इंग्रज अधिका-याच्या विमानाचे आहेत. इंग्रज अधिकारी विमानातून पाहणी करत असताना हे विमान तलावात कोसळले. यामध्ये एक वैज्ञानिक आणि दोन अधिका-यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने आणि अत्याधुनिक यंत्र सामुग्री नसल्याने हे विमान तळ्यातून बाहेर काढता आले नव्हते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तलावात विमानाचे अवशेष सापडण्याची हि पहिली वेळ नसून यापूर्वी देखील अशा प्रकारचे अवशेष सापडले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like