IPL 2021 : रविचंद्रन अश्विनच्या कुटुंबातील 10 जण कोरोना पॉझिटिव्ह, पत्नीचे ट्विट – ‘5 ते 8 दिवस वाईट स्वप्नासारखे’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – रविचंद्रन अश्विनच्या कुटुंबातील 10 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ही माहिती त्याच्या पत्नीने दिली. त्यांनी संपूर्ण आठवड्याला वाईट स्वप्न म्हटले आहे आणि सांगितले की, घरात 10 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अश्विन आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत होता. परंतु, त्याने मागील रविवारी लीगमधून ब्रेक घेतला, जेणेकरून कठिण काळात कुटुंबासोबत राहता यावे.

https://twitter.com/prithinarayanan/status/1388145447437406211

अश्विनने आयपीएल 2021 मधून नाव मागे घेतल्याच्या एक दिवसानंतर त्याच्या पत्नीने ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी कुटुंबातील संसर्गाची माहिती दिली. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, आता सर्वांना केवळ ओके सांगू शकते. 6 मोठे आणि 4 मुले एकाच आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सर्वांना वेगवेगळे घरी आणि हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. हा आठवडा आमच्यासाठी वाईट स्वप्नासारखा गेला. 3 पॅरेंट्सपैकी एकजण घरी परतले आहेत.

पृथी यांनी पुढे लिहिले आहे की, मला वाटते की, शारीरीक त्रासाला तोंड देणे जास्त सोपे आहे, पण मानसिक त्रास खुप अवघड आहे. मागील 5 ते 8 दिवस माझ्यासाठी खुप कठिण होते. सर्व लोक तिथे मदतीसाठी उभे असतील पण मदत करू शकणार नाहीत. हा रोग तुम्हाला लोकांपासून वेगळा करणारा आहे.