Coronavirus : नेपाळच्या पंतप्रधानांचा मोठा आरोप, म्हणाले – ‘भारतातून योग्य तपासणीशिवाय येतायेत लोक, त्यामुळे पसरतोय कोरोना’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आता उघडपणे चीनची भाषा बोलत आहेत. सोमवारी त्यांनी भारतावर मोठा आरोप केला. ते म्हणाले की, दक्षिण आशियातील इतर देशांपेक्षा नेपाळमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. तसेच भारतातून लोक योग्य तपासणीशिवाय येत आहेत, यामुळे कोविड – 19 नेपाळमध्ये पसरला आहे. यापूर्वी बुधवारी नेपाळने आपला नवीन सुधारित राजकीय व प्रशासकीय नकाशा प्रसिद्ध केला असून त्यामध्ये लिम्पीयाधुरा, लिपुलेख आणि कलापाणी यांचा समावेश आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरा हे नेपाळचे आहेत, यावर जोर दिला.

नेपाळने नवीन नकाशा जाहीर केल्यानंतर भारताकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकारे या प्रदेशात कृत्रिम विस्ताराचा दावा मान्य केला जाणार नाही, असे भारताने बुधवारी सांगितले. भारताने शेजारच्या देशाला असे अनुचित नकाशे टाळायला सांगितले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, “अशी एकतर्फी कामे ऐतिहासिक तथ्ये आणि पुराव्यांवरून होत नाहीत. हे द्विपक्षीय समजुतीच्या विरूद्ध आहे, ज्यामध्ये राजनैतिक वाटाघाटींद्वारे प्रलंबित सीमा प्रश्नांचे निराकरण करण्याची मागणी केली जाते. ”

नेपाळमध्ये कोरोनाची 72 नवीन प्रकरणे
सोमवारी नेपाळमध्ये कोरोना विषाणूची 72 नवीन प्रकरणे नोंदवली गेली , यासह देशात संक्रमित रुग्णांची संख्या 675 वर पोहोचली. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नेपाळने 2 जूनपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन वाढविला आहे. नेपाळ हा कोरेना विषाणूचा सर्वात कमी प्रमाण असलेल्या देशांपैकी एक आहे. 24 मार्चला नेपाळमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, जे आता 2 जूनपर्यंत लागू राहील. दरम्यान, नेपाळने 14 जूनपर्यंत सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत.