Asia XI Vs World XI : विराट कोहली – ख्रिस गेल यांच्यात ‘सामना’ रंगणार, अनेक दिग्गज खेळणार जागतिक संघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेश येथे शेख मुजीबूर रहमान यांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त BCB Asia XI vs World XI यांच्यात दोन २०-२० सामना आयोजित करणार आहे. स्मृतिदिनानिमित्त 18 आणि 21 मार्चला ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता विराट कोहली विरुद्ध ख्रिस गेल असा सामना पाहायला भेटणार आहे. आशिया संघाचे प्रतिनिधीत्व विराट कोहली सह सहा भारतीय खेळाडू करणार आहेत. BCB ने आशिया एकादश आणि जागतिक एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

BCCI चा पाकिस्तानी खेळाडूंना विरोध
बीसीसीआयचे सरचिटणीस जयेश जॉर्ज यांनी सांगितले की, यात आशिया एकादश संघात पाकिस्तान चा एकही खेळाडू नसणार नाही अशी आम्ही खात्री करून घेतली आहे. दोन्ही देशाचे खेळाडू एकत्र येऊ नये, असे आमचे स्पष्ट मत आहे. जागतिक एकादश आणि आशिया एकादश यांच्यातले ट्वेंटी-20 सामने 16 ते 20 मार्च या कालावधीत होणार आहेत. या दरम्यान पाकिस्तान सूपर लीगही आहे आणि त्याचा अंतिम सामना 22 मार्चला होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू येणार नसल्याचं त्यांनी BCB ला कळवले आहे.

भारताचे सहा खेळाडू
भारताचा कर्णधार विराट कोहली सह रिषभ पंत, कुलदीप यादव, शिखर धवन, मोहम्मद शमी आणि लोकेश राहुल हे खेळणार आहेत.

जागतिक संघ
ख्रिस गेल, अॅलेक्स हेल्स, फॅफ ड्यु प्लेसिस, निकोलस पूरण, ब्रेंडन टेलर, किरॉन पोलार्ड, आदील रशीद, लुंगी एनगिडी, अँण्ड्य्रू टाय, मिचेल मॅक्लेघन जॉनी बेअरस्टो, शेल्डन कॉट्रेल.

आशिया एकादश संघ
रिषभ पंत, विराट कोहली, शिखर धवन, मोहम्मद शमी, लोकेश राहुल, कुलदीप यादव, लिटन दास, लसिथ मलिंगाटी इक्बाल, मुश्फीकर रहीम, थिसारा परेरा, रशीद खान, मुस्ताफीजून रहमान, संदीप लामिछाने,  मुजीब उर रेहमान (विराट कोहली आणि लोकेश राहुल हे फक्त एका सामन्यासाठी असतील)

You might also like