Asian Games 2023 | भारताला 40 वर्षांनंतर ‘या’ चौघांनी जिंकून दिले सुवर्णपदक

नवी दिल्ली : Asian Games 2023 | आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आज भारतीय घोडेस्वारांनी सांघिक गटाचे सुवर्ण पदक जिंकले आहे. तब्बल ४० वर्षांनंतर भारताने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले. मंगळवारी नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल सांघिक गटात आणि महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले होते. (Asian Games 2023)

१९८२ नंतर आज मिळाले सुवर्णपदक

भारतीय घोडेस्वारी संघातील अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, हृदय विपूल छेडा आणि दिव्याकृती सिंग या चौघांनी मिळून सर्वाधिक २०९.२०५ गुणांची कमाई केली. वैयक्तिक गटात अनुषने ७१.०८८ गणांसह रौप्यपदक तर हृदयने ६९.९४१ गुणांसह कांस्यपदक जिंकले. दिल्लीतील १९८२ च्या आशियाई स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले होते. (Asian Games 2023)

इबाद आणि नेहाचे यश

सेलिंगमध्ये भारताच्या १७ वर्षीय नेहा ठाकूरने मुलींच्या Dinghy – ILCA4 प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्यानंतर इबाद अली (Eabad Ali) ने पुरुषांच्या Windsurfer RS:X गटात कांस्यपदक पटकावले. अशाप्रकारे दोन पदके भारताला या क्रिडा प्रकारात मिळाली.

इबाद अलीला तीन फेरींमध्ये अपयश आले होते, परंतु त्याने पुनरागमन करत ५७ गुणांसह तिसरे स्थान पटकावत कांस्यपदक जिंकले.

रिलेमध्ये राष्ट्रीय विक्रम
भारतीय पुरूष मेडली रिले संघाने ४ बाय १०० मीटर स्पर्धेत ३:४०.८४ सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला. २०१८मध्ये ३:४४.९४ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम होता. आता भारतीय संघ अंतिम सामन्यात खेळणार आहे.

तलवारबाजीत थोडक्यात पदक हुकले
तलवारबाजीत भारताच्या भवानी देवीचा उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या शाओ याकीने १५-७ असा पराभव केला.
यामुळे भारताला हे पदक गमवावे लागले. भवानी देवीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
मात्र तिला पदकाने हुलकावणी दिली. सामन्यात पंचाने विरोधात निकाल दिल्याचा आरोप तिने केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा झोन पाचमधील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा

Vijay Wadettiwar | ‘सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले’, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप