कबड्डीत भारताची सुवर्ण परंपरा खंडित 

जकार्ता – वृत्तसंस्था 
सलग सात वेळा सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरूष संघाला उपांत्यफेरीच्या सामन्यात इराणने पराभवाचा धक्का दिला आहे. इराणने भारतीय संघाचा  पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.आशियाई स्पर्धेतील भारताचा हा ऐतिहासिक पराभव ठरला. कारण यापूर्वी भारताने प्रत्येकवेळी सुवर्णपदक पटकावले होते.भक्कम बचावाच्या आधारावर इराणने भारतावर २७-१८ अशी ९ गुणांच्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

[amazon_link asins=’B074G3TJYF,B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bd885f55-a755-11e8-ad0a-e74512fef428′]

पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. त्यामुळेच पहिल्या सत्रात दोन्ही संघांची ९-९अशी बरोबरी झाली होती. भारताने यावेळी जोरदार आक्रमण केले, पण इराणने यावेळी चांगला मुकाबला केला .

दुसऱ्या सत्रामध्ये इराणने आपल्या पकडींच्या जोरावर भारताला काहीसे हतबल केले होते. इराणच्या अब्बासी मैसामने यावेळी दोन वेळा सुपर टॅकल केल्यामुळे इराणच्या गुणांमध्ये वाढ दिली. दुसऱ्या सत्रात चढाई करत असताना अजय ठाकूरला दुखापत झाली. त्याच्या कपाळावरून रक्त यायला लागल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली. सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील बाराव्या मिनिटाला ११७-१३ अशी आघाडी घेतली होती. सामन्याला तीन मिनिटे शिल्लक असताना इराणने २५-१४ अशी दमदार आघाडी घेतली होती.

अतिंम फेरीत इराणचा दक्षिण कोरियाशी सामना होणार आहे. आशियाई खेळाच्या इतिहासात भारतीय संघ पहिल्यांदाच सुवर्णपदकांपासून दूर राहणार आहे. त्यामुळे आता भारताला कांस्यपदकासाठी खेळावे लागणार आहे.

शियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीला 1990 साली सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंत भारताने सात सुवर्णपदके पटकावली होती. त्यामुळे आशियाई स्पर्धेतून पहिल्यांदाच भारतीय कबड्डी संघाला सुवर्णपदकाविना परतावे लागणार आहे.