कुटुंबातील पाचही जण घरात आढळले लटकलेल्या अवस्थेत, ‘या’ गोष्टीमुळे वाढले गूढ

कोक्राझार : वृत्तसंस्था – आसाममधील कोक्राझारमधिल एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत मिळाले आहेत. आर्थिक अडचणीमुळे कुटुंबातील पाचही जणांनी आपली जीवनयात्रा संपवीली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. घरात एक सुसाईट नोट मिळाली आहे. मात्र त्यातील मजकूर समजू शकला नसल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे.

निर्मल पाल (वय ४५), पत्नी मल्लिका (वय ४०), मुलगी पूजा (वय २५), नेहा (१७) आणि दीपा (१५) अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश रोशन यांनी दिली आहे. निर्मल पाल यांचे तुलसीबील मार्केटपरिसरात एलपीजीचे स्टोअर होते. दरम्यान त्यांच्या मोठा कर्जाचा बोजा होता. मुलांचे शिक्षण, कर्जाचा डोंगर आदी कारणाने ही आत्महत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

मात्र येथिल मार्केटमधिल व्यापाऱ्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार पाल यांनी एलपीजी कनेक्शन जोडण्याचे आश्वासन देऊन अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आहेत. मात्र ते आश्वासन पुर्ण करु शकले नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. तर दुसरीकडे पाल यांची आत्महत्या नसून त्याच्या विरोधात कट रचला गेला असून या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.