पोलिसात तक्रार केली म्हणून कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चवड येथील अजंठानगर येथे पोलिसांत तक्रार दिली म्हणून कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी (दि. 5) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

या प्रकरणी आनंद ज्ञानदेव तिरकर (22, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. तर योगेश सोनवणे (22), विनायक टेकाळे (20), अजिनाथ गायकवाड (23), आकाश बनसोडे (21), स्वप्नील गायकवाड (24), आदेश गायकवाड (23, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरकर याची आईला सांगवीला जायचे होते. यासाठी रिक्षा आणण्यासाठी तिरकर व त्याचा मित्र सोमनाथ हे दोघे भोपळे चौकात थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. ‘तू आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार का दिली’, असे म्हणून त्यांनी शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी कोयता हातावर मारून जखमी केले. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या मित्र सोमनाथ यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तपास निगडी पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/