सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ratan Tata | मौर्य घराण्यातील शासक सम्राट अशोक यांना सामान्य जनता ’अशोक द ग्रेट’ असे संबोधते, पण तुम्हाला माहिती आहे का की Tata Group नसता तर कदाचित या देशाला अशोकाचे मोठेपण कळले नसते. होय, ही 100 वर्षांहून अधिक जुनी गोष्ट आहे, जेव्हा टाटा ग्रुपने देशात प्रथमच असे काम केले, ज्याने या पृथ्वीचा इतिहास कायमचा बदलला. मौर्य घराण्याच्या वैभवशाली भूतकाळाशी आपल्याला पुन्हा जोडण्याचे मोठे काम टाटा ग्रुपनेच केले. (Ratan Tata)

 

अशी केली Sir Ratanji Tata यांनी मदत
टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) यांचे धाकटे पुत्र सर रतनजी टाटा यांनी वडिलांच्या निधनानंतर कंपनीची जबाबदारी स्वीकारली. बंगळुरूच्या Indian Institute of Science पासून ते Tata Steel पर्यंत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले, शिवाय भारताचा इतिहास शोधण्यातही त्यांनी योगदान दिले.

 

टाटा स्टोरीज : 40 टाइमलेस टेल्स टू इन्स्पायर यू (Tata Stories: 40 Timeless Tales to Inspire You) या पुस्तकात दिलेल्या कथेनुसार, मौर्य साम्राज्याची (Mauryan Empire) राजधानी पाटलीपुत्र आणि आधुनिक काळातील पाटणा यांच्यात संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारतात प्रयत्न केले जात होते. 1900 च्या आधी पाटणाच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी थोडेसे उत्खननही करण्यात आले होते, परंतु त्यात विशेष यश मिळाले नाही. (Ratan Tata)

 

1903 पर्यंत तत्कालीन ब्रिटिश सरकारने पाटलीपुत्राच्या शोधासाठी अधिक पैसे देण्यापासूनही माघार घेतली. याचवेळी टाटा समूहाचे सर रतनजी टाटा यांनी आजचे पाटलीपुत्र शोधण्याच्या कामासाठी मदत केली.

100 वर्षांहून जास्त जुनी कथा
ही कथा 1912-13 मधील आहे, जेव्हा सर रतनजी टाटा यांनी या पुरातत्व शोधात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. पुरातत्व महासंचालकांशी सल्लामसलत केल्यानंतर, त्यांनी या शोधासाठी दरवर्षी 20,000 रुपये योगदान देण्याचे आश्वासन दिले, तेही अमर्यादित काळासाठी.

 

त्यांच्या मदतीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पाटलीपुत्राचा शोध लावण्यात मदत झाली. 1912-13 च्या हिवाळ्यात, पुरातत्वशास्त्रज्ञ डी. बी. स्पूनर यांनी हा शोध सुरू केला आणि हे काम सुमारे 1917 पर्यंत अविरत चालू राहिले. सर रतनजी टाटा यांनी या शोधासाठी एकूण 75,000 रुपयांचे योगदान दिले. सर रतनजी टाटा यांचे 1918 मध्ये निधन झाले असले तरी त्यांच्या योगदानाने या देशाला सम्राट अशोकाचे वैभव पाहायला मिळाले.

 

शोधण्यात आला सम्राट अशोकाचा दरबार
पुरातत्व विभागाच्या शोधात टाटा समूहाचे योगदान आहे. पाटण्यातील कुमराहर येथे त्यासाठी उत्खनन करण्यात आले. स्पूनर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 10 फूट उत्खननानंतर येथे प्रथम विटांची जुनी भिंत सापडली.

 

यानंतर उत्खनन सुरूच राहिले आणि 7 फेब्रुवारी 1913 रोजी मोठे यश मिळाले.
त्या दिवशी अशोकाच्या सिंहासनाच्या कक्ष किंवा दरबाराचे खांब उत्खननात सापडले.
100 खांब असलेल्या या दरबार हॉलच्या वैभवाचा अंदाज तुम्ही लावू शकता.
त्यानंतर पुढील चार वर्षे हे ठिकाण पाटलीपुत्राचा इतिहास समोर आणत राहिले.
या ठिकाणाहून अनेक नाणी, फलक आणि टेराकोटाची शिल्पे निघत होती.

 

Web Title :- Ratan Tata | sir ratan tata funded patliputra excavation helped to find out emperor ashoka throne room

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

 

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम