Coronavirus : अंत्यसंस्कारासाठी पोहचले नाहीत ‘कुटुंबिय’, आरोग्य कर्मचार्‍यांनी दिला शेवटचा ‘निरोप’

हैद्राबाद : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये शनिवारी कोरोनाव्हायरसमुळे एका 74 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूमुळे तेलंगणातील हा पहिलाच मृत्यू आहे. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण कुटुंबातील कोणीही सदस्य तिथे पोहोचला नाही. एका टीव्ही चॅनलच्या म्हणण्यानुसार, केवळ आरोग्य कर्मचारीच त्याला अंतिम निरोप देत होते. खरं तर, त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना घरात आयसोलेट करून ठेवण्यात आलं होतं.

याशिवाय 21 दिवस लॉकडाऊन दरम्यान सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या अंतर्गत 20 हून अधिक लोक कोणत्याही अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की वृद्धाच्या निधनानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यांना रुग्णालयात आणल्यानंतर कोरोनाबाबत माहिती झाली. मृताला इतरही अनेक आजार होते. राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा 70 च्या वर गेला असल्याचे समजते आहे. सर्व रुग्णांना आयसोलेट ठेवून उपचार केले जात आहेत.

भारतातील कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. तथापि, कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशी चर्चा आहे की सरकार 21 दिवसांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊन वाढवू शकते. यामुळे लोकही खूप नाराज आहेत. तथापि, आता लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढणार ही बाब निराधार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.