विश्रांतवाडीत एटीएम फोडताना तरुण रंगेहात जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करत असताना अचानक गस्तीवरील पोलीस आल्याने तरुणाचा चोरीचा डाव फसला. हा प्रकार धानोरी रस्त्यावर बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला. विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे. बहिणीच्या लग्नासाठी पैसे हवे असल्याने त्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

विशाल रमाकांत चाबुकस्वार (२१, मु. पो. निलंगा जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. खाडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी धानोरी रोडवर काशीगंगा सोसायटीजवळ असलेल्या इमारतीमध्ये असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. एटीएममध्ये चोरीच्या घटना वाढलेल्या असल्याने रोजच्याप्रमाणे गस्तीच्या वेळी पोलीसांकडून एटीएम तपासले जात असताना आतून आवाज आल्याने त्यांनी आत पाहिले. त्यावेली विशाल चाबुकस्वार हा एटीएम मशीन स्क्रू ड्रायवरच्या साह्याने उचकटून मशीन फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने बहिणीच्या लग्नसाठी पैसे हवे असल्याने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

ह्याही बातम्या वाचा –

‘त्या’ वृद्धाच्या शरीरातून काढले तब्बल ५५० मुतखडे

Video Viral : जॅकलीनचा बेली डान्स चाहत्यांना करतोय घायाळ

नागपुरात ठरले : नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले

सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठरणार लोकसभा प्रचाराची दिशा

सोशल मीडियावरील आचारसंहितेचा पुढाऱ्यांनी घेतला धसका