Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजनेत खाते उघडण्यासाठी आधार E-KYC ने होईल काम, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana – APY) खाते उघडण्यासाठी आता आधार माहितीचा वापर करून आधार केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. एपीवाय मेंबर होण्यासाठी बँकेच्या शाखेत जाणे, नेट बँकिंग किंवा एपीवाय सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही इतर डिजिटल मोडच्या माध्यमातून प्रक्रिया (Atal Pension Yojana) होते.
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (Pension Fund Regulatory and Development Authority of India – PFRDA) ने 27 ऑक्टोबर 2021 ला एका सर्क्युलर (circular) द्वारे ही सुविधा सुरू करण्याची घोषणा केली. पीएफआरडीए सर्क्युलरनुसार आता आउटरीच आणखी वाढवणे आणि सदस्यत्वाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, सीआरए (Central Recordkeeping Agency – CRA) आधार ई-केवायसीच्या माध्यमातून एक अतिरिक्त पर्याय म्हणून बोर्डिंगवर डिजिटल उपलब्ध करेल. बोर्डिंगवर आधारित आधार एक्सएमएल अगोदरच उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आहे.
कशी होते प्रक्रिया?
सर्क्युलरनुसार ई-केवायसी तंत्रज्ञान संरचनेच्या माध्यमातून संभाव्य ग्राहकाकडून प्राप्त माहिती जसे आधारची माहिती, इतर माहिती, पेन्शन रक्कम, पेमेंटची पद्धत, पती/पत्नी/नॉमिनीचे नाव आणि बँक खात्याची माहिती इत्यादी. ही सर्व माहिती त्या बँकांशी शेयर केली जाईल, ज्यामध्ये सबस्क्रायबरने आपले सेव्हिंग खाते उघडले (Atal Pension Yojana) आहे.
ज्यामध्ये ग्राहकांने निवडलेल्या पेन्शन रक्कमेच्या आधारावर निर्दिष्ट रक्कम/मोडसाठी ऑटो डेबिट केली जाईल. एपीवाय खाते उघडल्यानंतर संबंधित एपीवाय सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे ग्राहकांना नंतरची सर्व्हिस ऑफर केली जाईल.
अशाप्रकारे, एपीवायचे सदस्यत्व घेण्याची प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी, PFRDA ने सर्व एपीवाय सेवा प्रदाता बँकांना ग्राहकांच्या लाभासाठी आपल्या संबंधित कॉर्पोरेट वेबसाइटवर ई-एपीवाय लिंक प्रदान करण्यास सांगितले आहे.
–
याशिवाय, सीआरएला सल्ला दिला आहे की,
त्यांनी सिस्टम-स्तरीय एकात्मिकतेसाठी सर्व एपीवाय सेवा देणार्यांसोबत जोडले
जावे जेणेकरून आधार सीडिंगसाठी ई-केवायसी आधारित एपीवाय ऑन-बोर्डिंग
आणि सहमती संरचना लवकरात लवकर उपलब्ध करता येईल.
आधार-एपीवाय खाते लिंक करणे / Linking Aadhaar-APY account
सर्व एपीवाय खाती आधार क्रमांकाशी जोडली जाणार आहेत,
यासाठी सीआरए सध्याच्या एपीवाय ग्राहकांचे आधार योग्य सहमती तंत्राच्या माध्यमातून जोडण्याची सुविधा प्रदान करणार आहे.
शिवाय, एपीवाय सेवा प्रदाता आपल्या सर्व ग्राहकांकडून योग्य सहमतीसह आधार माहिती सुद्धा गोळा करत आहे,
जी सर्क्युलरनुसार सीआरएसोबत सामायिक केली जाईल.
APY काय आहे?
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे.
यामध्ये वयाच्या हिशेबाने मंथली प्रीमियम ठरलेला असतो.
सर्वात कमी प्रीमियम 18 वर्षाच्या वयात योजनेचा लाभ घेतल्यास द्यावा लागतो.
सर्वात जास्त प्रीमियम 30 वर्षाच्यानंतर द्यावा लागतो.
कारण पेन्शनची किमान रक्कम 1000 मासिक आणि कमाल 5000 मासिक ठरवलेली आहे.
प्रीमियम देताना पेन्शनच्या रक्कमेला आधार बनवले जाते.
Web Title :- Atal Pension Yojana | pfrda launches new facility for opening of atal pension yojana account using aadhaar e kyc
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा ‘पंच’ किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी