Atal Sanskriti Gaurav Award | अटल संस्कृती पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे व डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 डिसेंबरला बालगंधर्व येथे पुरस्कार प्रदान केला जाणार – मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Atal Sanskriti Gaurav Award | कोथरूड येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा अटल संस्कृती पुरस्कार ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे (Dr Prabha Atre) आणि उद्योजक प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी (Dr. Pramod Chaudhary) यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे (Sanskriti Pratishthan) अध्यक्ष व माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Atal Sanskriti Gaurav Award)

यंदा अटल बिहारी वाजपेयी यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. हे निमित्त साधून यंदा 25 डिसेंबरला बालगंधर्व रंग मंदिर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (Atal Sanskriti Gaurav Award)

मोहोळ यांनी सांगितले की, अटल जी यांच्या निधनानंतर संस्कृती प्रतिष्ठाननंतर या पुरस्काराची सुरुवात केली.
अटलजींचे पुण्याशी दीर्घकाळ नाते राहिले आहे. त्यांचा येथे अनेक कार्यक्रमात सहभाग राहिला आहे.
त्यामुळे आम्ही त्यांच्या स्मृती जपण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला. मागील वर्षी काही अडचणींमुळे हा पुरस्कार सोहोळा होऊ शकला न्हवता. त्यामुळे मागील वर्षीचा व यंदाचा असे दोन्ही पुरस्कार एकाचवेळी प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार सोहोळयानंतर अटलजींचा जीवन प्रवास आणि कवितांवर आधारित संवाद पुणे निर्मित आव आवो फिरसे
दिया जलाये हा कार्यक्रम तसेच फोटोग्राफी, शिल्पकला, चित्रकला, रंगावली, कॅलिग्राफीचे ‘ अटलपर्व ‘ हे प्रदर्शन
देखील आयोजित करण्यात येणार आहे. 25 डिसेंबर ला सकाळी शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे,
अशी माहिती मोहोळ यांनी दिली. याप्रसंगी संवाद पुणे चे सुनील महाजन (Sunil Mahajan) उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena Thackeray Group | १४३ खासदारांच्या निलंबनावरून शिवसेनेचा मोदी सरकारवर प्रहार, ”तर मोदींनी आंबेडकर, सरदार पटेलांचंही…”

Covid New Variant JN 1 | सतर्क राहा, घाबरू नका! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

नुकसान भरपाई मागितल्याच्या रागातून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग, पुण्यातील निलायम ब्रीज येथील प्रकार

महिलेला अश्लील शिवीगाळ करुन पतीला मारण्याची धमकी, पुणे कॅम्पमधील प्रकार

पुणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार, दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल