चक्क BOM चे ATM मशीनच उचलून नेले ; १७ लाख रुपयांची रोकड लांबवली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – चोरट्यांनी एटीएम मशीनच उचलून नेले आहे. या मशीनमध्ये 17 लाख 18 हजार रुपयांची रोकड होती. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शाखेसमोर आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक रस्त्यावरील प्रसाद कॅफेसमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या गुंजाळवाडी शाखेशेजारी एटीएम मशीन आहे. चोरट्यांनी मिनी एटीएम मशीन असलेल्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन वेगळे केले व चक्क उचलून नेले.

काही अंतरावर गेल्यावर एटीएम मशीनची तोडफोड करत १७ लाख १८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. आज सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, पोलिस निरीक्षक अभय परमार, उपनिरीक्षक पंकज निकम यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

आरोग्य विषयक वृत्त – 

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज करा…आणि कॅलरीज होतील बर्न

सावधान ! मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो ‘ब्रेन कँन्सर’

मन आणि शरीराच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे

Loading...
You might also like