पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ भारतसाठी पुण्यातील ‘या’ व्यावसायिकाने जे केलं, जाणून तुम्हीही म्हणाल ‘मानलं’ 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरस दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आत्मनिर्भर  भारत मोहीम सुरू केली. या आत्मनिर्भर मोहिमेअंतर्गत त्यांनी स्वदेशी गोष्टींचा अवलंब करुन देशवासियांना देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत स्वावलंबी भारत अभियानाने प्रेरित महाराष्ट्रातील पुण्यातील एका व्यावसायिकाने ग्राहकांच्या ओळखीसाठी देशी व परदेशी वस्तू वेगळ्या केल्या आहेत.

पुण्यातील एका जनरल स्टोअरमध्ये व्यावसायिकाने ग्राहकांच्या सोयीसाठी वस्तूंवर ‘स्वदेशी’ आणि ‘परदेशी’ असे लेबल लावले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्टोअरच्या व्यावसायिकाने सांगितले की, ‘आम्ही ही प्रणाली सुरू केली आहे, कारण कोणता ब्रँड भारतीय आहे आणि कोणता आंतरराष्ट्रीय आहे हे लोकांना माहिती नाही.  आत्मनिर्भर भारत अभियानाच्या समर्थनार्थ हे पाऊल उचलले गेले आहे.

सोशल मीडियावर व्यावसायिकाच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले – या प्रकारची व्यवस्था संपूर्ण भारतभर झाली पाहिजे. दुसरा वापरकर्ता लिहितो – ग्राहकांना परदेशी आणि स्वदेशी ओळखण्याचा अधिकार आहे. दुकानदाराने खूप चांगले काम केले आहे. आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले – ‘टाळ्या’. त्याचबरोबर काही लोकांनी म्हंटले  की, आता दुकानदारांनी भारतात फक्त देशी वस्तूंची विक्री केली पाहिजे.