‘सनबर्न फेस्टिव्हल’ मध्ये बॉम्बस्फोटाचा कट रचणारा ‘देवडेकर’ पुणे ATS च्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सनबर्न फेस्टिव्हलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याबरोबरच बेछूट गोळीबार करण्याच्या कटातील फरार आरोपी ऋषीकेश देवडेकर याला पुणे एटीएसने अटक केली आहे. गौरी लंकेश हत्याप्रकरणात देवडीकरला कर्नाटक एटीएसने अटक केली होती. तेथून त्याला पुण्यात आणण्यात आले असून 11 फेब्रुवारीपर्य़ंत त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. नालासोपारा शस्त्रसाठा-लंकेश हत्या ते सनबर्न अशी लिंक समोर आली आहे.

देवडीकर हा मुळचा औरंगाबदाचा रहिवाशी असून तो सनातनचा कार्यकर्ता आहे. त्याने आपल्या पत्नीसह गोवा येथील एका आश्रमात वास्तव्यास होता. नालासोपरा येथे सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणात त्याचा महाराष्ट्र एटीएस शोध घेत होते. तो गोव्यात असल्याचे समजल्यावर एटीएसचे एक पथक गोव्यात गेले होते. मात्र तो गोव्यातून फरार झाला होता. गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणात देवडीकर याचा शोध घेण्यात येत होता.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीमध्ये पुण्यातील पाश्चात्य संस्कृतीचे द्योतक असल्याचे सांगत सनबर्न फेस्टिव्हलला लक्ष करण्यात आले होते. फेस्टिव्हमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणि बेछूट गोळीबार करण्याचा डाव असल्याची धक्कादायक माहिती यापूर्वीच्या तपासात समोर आली होती. देवडीकर याच्या चौकशीतून अन्य माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.