‘जुळता जुळता जुळेना’ सेटवर हल्ला

कोल्‍हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

‘जुळता जुळता जुळेना’ या मालिकेचे केर्ली (ता. करवीर) येथे चित्रीकरण सुरु असून या मालिकेच्या दिग्दर्शकाला दमदाटी करुन सेटची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी उपसरपंचासह ९ जणांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली. हा प्रकार सोमवारी (दि.६) रात्री घडली.

याप्रकरणी अमित पाटील, दगडू कांबळे, किरण कांबळे, चंद्रकांत कोपार्डे, अक्षय पाटील, अवधूत पाटील, अमित मोहिते, कपिल पाटील, रवींद्र पाडेकर (सर्व रा. केर्ली) या सर्वांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे.

केर्ली (ता. करवीर) गावातील माने बंगला येथे ‘जुळता जुळता जुळेना’ या मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. शूटींगला प्रोटेक्शन म्हणून आम्हाला पैसे द्यावे लागेल असे उपसरपंच अमित पाटील व साथीदारांनी दिग्‍दर्शकाला धमकावले. पैसे देण्यास नकार दिल्याने सोमवारी रात्री सेटवरील गाड्यांची, शूटिंगच्या साहित्याची मोडतोड करण्यात आली. यावेळी दिग्दर्शक गौतम कोळी यांना धक्काबुक्की करण्‍यात आली. ही मालिका सोबो फिल्‍म प्रायव्‍हेट लिमिटेड मुंबई प्रोडक्‍शनची आहे.