वन विभागाच्या अंबाबरवा कॅम्पवर हल्ला, मेळघाट अभयारण्यातील कॅम्प उध्वस्त करण्याची धमकी

संग्रामपुर : पोलीसनामा ऑनलाइन – मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील एका कॅम्पवर मध्य प्रदेशातील गुन्हेगारांनी हल्ला केला असून येथील दोन्ही कॅम्प ८ दिवसात हटविले नाही तर ते कॅम्प ला उध्वस्त करण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे वन्यजिव विभाग सतर्क झाला आहे.

सोनाळा गावा पासून २२ किलोमीटर अंतरावर अंबाबरवा अभयारण्यात वन्यजीव विभागाचा अंबाबारवा कॅम्प आहे. त्याला लागूनच चुनखडी कॅम्प आहे. या दोन्ही कॅम्पला मध्यप्रदेशातील पाचोरी येथील काही गुन्हेगार प्रवुत्तीच्या लोकांनी उध्वस्त करण्याची वनविभागाला धमकी दिल्याने अभयारण्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आला. वन्यजीव विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील पाचोरी या गावातील काही नागरीकांनी बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अंबाबरवा कॅम्पवर वनपाल वनरक्षक व वनमजुर यांच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

कँप वर उपस्थित वनपाल डी.डी. सोनोने, वनरक्षक एस. व्ही. कायंदे व वनमजुरांनी येथुन पळ काढाला. तत्पुर्वी वनरक्षक ए. आर. चिमुटे यांना दोन दिवसापूर्वी काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी अभयारण्यात पकडून धक्का बुक्की करीत अंबाबारवा कॅम्प व चुनखडी कॅम्प आठ दिवसाच्या आत हटवण्याची ताकीद दिली होती. दोन्ही कॅम्प अभयारण्यातून न हटविल्यास उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली होती. वन विभागाच्या कॅम्पमुळे तस्करीचा बाधा येऊ लागल्याने ते हटविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

या घटनेची माहिती बुधवारी सकाळी सोनाळा पोलिस स्टेशनला देण्यात आली असता पोलिसांसह आकोट वन्यजिव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुरेश खराटे, सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. कांबळे यांनी दोन्हीही कँम्पची पाहणी करून कडेकोट बंदोबस्त लावला.

जाणून घ्या कढीपत्त्याचे फायदे !

केळी खाण्याचे १० फायदे, जाणून घ्या

मक्याचा उपमा खाण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

‘हे’ उपाय करा अन् मेकअप न करता दिसा एकदम सुंदर, जाणून घ्या

मुलांना नैसर्गिकरित्या गोरे करतात ‘हे’ ५ घरगुती उपाय; जाणून घ्या

हिंगात अनेक औषधी गुणधर्म, ‘हे’ २० रामबाण उपाय, जाणून घ्या