स्मार्ट फोन ठरतोय जीवघेणा ; व्हाट्सअ‍ॅप डीपी लावल्याने हल्ला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – एकाने स्मार्ट फोनमधील व्हाट्सअ‍ॅप डीपी वर ठेवलेला नातेवाईक मुलीचा फोटो काढण्यास सांगितल्याच्या रागातून टोळक्याने एकावर जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

या प्रकरणी दतात्रेय नारायण जरे (३५ , रा. वाकी.बु, ता.खेड जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली असून त्याला मारहाण करण्यात आली आहे. तर संदेश मारुती टोपे, संतोष मच्छींद्र टोपे, निखील बाळासाहेब गारगोटे, अंकुश संतु गारगोटे, सुरज अशोक टोपे, अजय अंकुश गारगोटे ( सर्व रा. वाकी बु, ता.खेड, जि.पुणे ) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरे व सचिन बबन जरे हे दोघे मोटार सायकलवरुन गारगोटे शिवीराची शाळा वाकी बु. येथून वस्तीकडे जात होते. संदेश टोपे, संतोष टोपे, निखील गारगोटे, अंकुश गारगोटे, सुरज टोपे, अजय अंकुश गारगोटे यांनी संगनमत करून रस्त्यावर काठ्या टाकुन जरे यांच्या मोटार सायकलीस त्यांच्या मोटार सायकलने धडक देऊन अडवले.

‘तू निखीलला तुझ्या नात्यातील मुलीचा फोटो व्हाट्सअ‍ॅप डीपी वरून काढून टाकण्यास का सांगितले ?’ अशी विचारणा करीत संदेश टोपे याने त्याच्या हातातील गजाने व अन्य सर्वांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्यांनी जरे यांना जबर मारहाण केली. तपास चाकण पोलिस करत आहेत.