बारामतीमधील उद्योजकाचा हत्येचा कट उधळला ; दोन संशयितांना अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती परिसरातील उद्योजक संग्राम तानाजीराव सोरटे (रा. मगरवाडी, ता. बारामती) व त्यांचा मावसभाऊ प्रसाद भगवानराव खारतुडे (रा. अशोकनगर, बारामती) यांची रेकी करत कट करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. जयचंद संतोष जाधव (वय 19, रा. सोमेश्वरनगर बारामती ) व सचिन कल्याण सोरटे (वय ४०, रा. मगरवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघा तरूणाची नावे आहेत.

व्यावसायिक भागीदारीतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याबाबत सोरटे यांनीच शहर पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दाखल केली. पोलिसांनी जयचंद जाधव याला अटक केल्यानंतर त्याने सचिन सोरटे याचे नाव सांगितल्यावर त्यालाही अटक करण्यात आली आहे.

दि. १७ जुलै रोजी प्रसाद खारतुडे यांना यासंबंधीचा सुगावा लागला. दोघा आरोपींनी संग्राम यांना रिव्हॉल्व्हरने तर प्रसाद यांना कोयता व तलवारीने मारण्याचा कट रचला होता. तर खारतुडे याचा मेडद येथील शेतात जावून पाठलाग करण्यात आला होता. या घटनेचा सुगावा लागताच सोरटे व खारतुडे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेतली. त्यांनी अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. मीना यांनी बारामती गुन्हे शाखेला ही जबाबदारी दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ जयचंद याला ताब्यात घेताच या कटाचा उलगडा झाला.

पोलिसांनी दोघा आराेपी विराेधात खूनाचा प्रयत्न, कट रचणे तसेच आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश आस्वर अधिक तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –