धक्कादायक ! अंगावर पेट्रोल टाकून ज्येष्ठ नागरिकाला पेटविले

नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या भांडणाचा राग मनात धरून ५५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मांजरवाडी येथे बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

या घटनेत रशिदभाई तांबोळी हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी शोएब रशिद तांबोळी (वय २४, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ऋषिकेश पोपट लोखंडे (वय २०) व किरण कानिफनाथ जाधव (वय २१, दोघेही रा. मांजरवाडी, ता. जुन्नर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रीटचे काम सुरू असताना ऋषिकेश लोखंडे हा त्या रस्त्यावरून दुचाकीने जात असताना त्यांना रशिदभाई तांबोळी यांनी मज्जाव केला. त्यावेळी दोघांमध्ये भांडणे झाले होते. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून मंगळवारी मध्यरात्री १ च्या सुमारास ही घटना घडली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like