भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न, नागरिकांनी एकाला पकडून केले पोलिसांच्या हवाली

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एका कापड दुकानात चाकुच्या धाकाने दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यापाऱ्याच्या सर्तकतेमुळे आणे नागरिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे दरोडेखोरांचा हा प्रयत्न फसला. नागरिकांनी एका दरोडेखोराला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार आज (रविवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.

तुमसर येथे एका कापड दुकानात शिरुन चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या ही बाब लक्षात येता त्यांनी दरोडेखोरांवर हल्ला केला. यामध्ये एक चोरटा सापडला. या घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चिडलेल्या व्यापारी आणि नागरिकांनी चोरट्याला बेदम चोप दिला. पोलीस घटनास्थळी वेळीच पोहचल्याने त्यांनी चोरट्याला नागरिकांच्या ताडवडीतून ताब्यात घेतले.

विकास उर्फ दुबली दलीराम गिल्लोरकर (वय-३४ रा. कुंभारेनगर, तुमसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत असून पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.