Satara News : प्रजासत्ताक दिनी 3 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा शहरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अँट्रोसिटी अंतर्गत पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेण्याच्या मागणी साठी एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडला आहे.

मनोहर सावंत असे आत्मदहन करणाऱ्याचे नाव आहे. यावेळी पोलीसांनी सतर्कता दाखवून सावंत यांना आत्मदहनापासून वेळीच थांबविले व त्यांना आपल्या ताब्यात घेतले.

दुसरा प्रकार कण्हेर प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या पिंपरी शहापूर येथील काही जणांनी पिंपरी गावात 25 एकर जमीन महसुल जादा जोडल्याने प्रकल्प ग्रस्ताची गळचेपी होत असल्याच्या कारणावरुन आत्मदहनाचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला आहे.