Aurangabad Accident News | अपघाताचे फोटो काढताना घडली दुर्दैवी घटना; 53 वर्षीय व्यक्तीला विनाकारण गमवावा लागला जीव

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Accident News | औरंगाबाद शहरातील हर्सूल रोडवर एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये अपघात झालेल्या व्यक्तीचा फोटो काढताना एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. फोटो काढत असताना या व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब अंबादास कळूशे (रा. जाधववाडी) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Aurangabad Accident News)

काय आहे नेमके प्रकरण?
जगदीश सांगळे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाहनाला हर्सूल रोडवर अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच बाबासाहेब कळूशे हे त्यांच्या दुचाकीने घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि ते दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अपघातग्रस्त सांगळे यांच्याकडे गेले. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मोबाईलमधून अपघातग्रस्त सांगळे यांचा फोटो काढण्यास सुरुवात केली. (Aurangabad Accident News)

बाबासाहेब हे फोटो काढत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या (एम. एच. 03 बी. जे. 7515) या
कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की, बाबासाहेब सुमारे 8 ते 10 फूट दूर फेकले गेले.
यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.
यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी बाबासाहेब यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले
मात्र त्यागोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. हर्सूल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Aurangabad Accident News | a 53 year old man died after being hit by a car while taking pictures of a person injured in an accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Latur Crime News | माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

NCP MP Supriya Sule | आधी खाल्ल मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन, शिवसेना नेत्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेचं स्पष्टीकरण