Aurangabad Crime | अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेलेल्या 17 वर्षीय मुलीचं बंद खोलीत धक्कादायक कृत्य

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बारावीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या suicide) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात (Aurangabad Crime) घडली आहे. संबंधित मुलगी अभ्यास करण्यासाठी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली होती. मुलीने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. मन हेलावून टाकणारी ही घटना औरंगाबाद शहरातील (Aurangabad Crime) मोंढा परिसरात घडली आहे.

 

सोनाली प्रमोद गवारे Sonali Pramod Gaware (वय-17) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. मयत मुलगी जुन्या मोंढ्यातील भवानीनगरमध्ये आई-वडिल, भाऊ, आजी, आजोबा, काका-काकू आणि त्यांची मुले अशा एकत्रित कुटुंबात राहते. सोनाली शहरातील सरस्वती भुवन विद्यालयात (Saraswati Bhuvan Vidyalaya) इयत्ता 12 वीच्या वर्गात शिकत होती. तिचे वडील शहरामध्ये रिक्षा चालवण्याचे काम करतात तर आई गृहीणी आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सोनालीने आपल्या कुटुंबासोबत जेवण केले. यावेळी तिने हसत खेळत कुटुंबातील सर्वांसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर अभ्यास करायचा असल्याचे सांगून ती दुसऱ्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेली. काही वेळाने सोनालीच्या भावाला मोबाईल पाहिजे असल्याने तो वरच्या मजल्यावर गेला. त्यावेळी त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला परंतु आतून कोणताच प्रतिसाद आला नाही.

 

बराच वेळ दरवाजा ठोठावूनही सोनाली दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनी खोलीकडे धाव घेतली.
यावेळी दरवाजा तोडला असता सोनाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
दरवाजा उघडल्यानंतर समोरील दृष्य पाहून कुटुंबाची पायाखालची जमीनच सरकली.
या घटनेची माहिती जिन्सी पोलीस ठाण्यात (Jinsi police station) देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (Aurangabad Crime) नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Aurangabad Crime |17 years old girl commits suicide in aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा