Aurangabad Crime | औरंगाबाद मधील खळबळजनक घटना ! कारमधील स्फोटानंतर मृतावस्थेत आढळलं नग्न ‘कपल’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बंद कारमध्ये अचानक स्फोट (Car Explosion) झाल्याने त्यातील नग्न प्रेमी युगुलाचा (Naked Couple) मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरात (Aurangabad Crime) घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.13) सायंकाळी औरंगाबाद शहरालगत (Aurangabad Crime) असलेल्या गांधेली शिवारात (Gandheli Shivara) घडली आहे. ही कार शहरातील एका बिल्डरची (Builder) असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप मृतांची ओळख पटली नसून कारमधील एसीमुळे (AC) स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

 

औरंगाबाद शहरालगत (Aurangabad Crime) असलेल्या गांधेली शिवारात सहारा सिटीचे (Sahara City) काम सुरु आहे. या प्रोजेक्टच्या पाठिमागे असलेल्या मोकळ्या जागेत एक कार बेवारस आढळून आली होती. कारची पाहणी केली असता त्यामध्ये आक्षेपार्ह स्थितीत प्रेमी युगुल मृतावस्थेत आढळून आले. दोघांची वय चाळीस वर्षापर्य़ंत असावीत. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. कारच्या सर्व काचा बंद असल्याने त्यातील एसीमुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

घटनेची माहिती मिळताच चिखलठाणा पोलीस ठाण्यातील (Chikalthana Police Station) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये (Ghati Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवले.
कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती समोर येत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Aurangabad Crime | exciting naked couple found dead after car explosion incidents in aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock List | ‘हे’ 5 मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणुकदारांना करत आहेत मालामाल, 31 दिवसात मिळाला 550% चा जबरदस्त रिटर्न, पोर्टफोलियोमध्ये करू शकता समावेश!

 

Shreyas Iyer | कोलकाताच्या कर्णधारपदाची धुरा मुंबईकर खेळाडूवर; KKR ची मोठी घोषणा

 

Ajit Pawar | ’10 मार्चला मंत्रिमंडळात फेरबदल?’ नाना पटोलेंच्या विधानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…