Ajit Pawar | ’10 मार्चला मंत्रिमंडळात फेरबदल?’ नाना पटोलेंच्या विधानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी 10 मार्चला मंत्रिमंडळात फेरबदल होतील, असं वक्तव्य केलं होतं. पटोले यांच्या वक्तव्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे. असे कोणतेही बदल होणार नाही, याचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे प्रमुख ठरवतील. असं म्हणत अजित पवार यांनी पटोलेंचे विधान फेटाळले आहे. त्यावेळी ते मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलत होते.

 

‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 10 मार्चला मंत्रिमंडळामध्ये बदल होईल असा दावा केला होता. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ”हे सरकार शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आणले आहे. सरकारमध्ये काही बदल करायचे आहे की नाही, हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन ठरवतील. हे ठरवतील तसे आम्ही काम करत आहोत. राज्याचे प्रमुख जे ठरवतील ते होईल,” असं म्हणत मंत्रिमंडळात खातेवाटपाची चर्चा फेटाळून लावली आहे.

 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ”तिन्ही पक्षात मतांतर होणार नाही याची काळजी घेतली जाते.
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवला. मतांची विचारधारा वेगळी असू शकते पण यापूर्वी अशी कटुता कधीच नव्हती.
यापूर्वीही सरकार वेगवेगळी आली. महाराष्ट्राला न शोभणारी वक्तव्य केली जात आहेत, मत स्वातंत्र्य असले तरीही ही महाराष्ट्राची परंपरा नाही.”

 

Web Title :- Ajit Pawar | cabinet reshuffle on march 10 ncp leader ajit pawar gave a direct answer to nana patole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह बाथरुममध्ये टाकून फरार झालेल्या आरोपीच्या विमानतळ पोलिसांनी बिहारमधून आवळल्या मुसक्या

 

Shivajirao Adhalrao Patil | खा. अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटलांचा निशाणा; म्हणाले…

 

BJP MLA | योगी आदित्यनाथ यांना मत दिलं नाहीतर घरे पाडू; भाजप आमदाराची धमकी