Aurangabad Crime News | ट्रकची विक्री करून स्वतःच नोंदवायचा तक्रार; अशा प्रकारे झाला रॅकेटचा पर्दाफाश

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Crime News | औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत विम्याची रक्कम हडपण्याचा डाव रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील मुख्य आरोपी आधी ट्रक विक्री करायचा आणि नंतर स्वतःच ट्रक चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल करायचा. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता चोरीची तक्रार देणारा फिर्यादीच या प्रकरणातील आरोपी असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक करून सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. संतोष प्रभाकर अंगरख (वय 38 वर्षे , रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर), बहादूरसिंह चौहान आणि प्रतीक मिसाळ असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. (Aurangabad Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?

संतोष प्रभाकर अंगरख याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, त्याने 14 फेब्रुवारीला सातारा पोलिस ठाण्यात आपला ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्याने लिहिले होते कि, 5 डिसेंबर रोजी सायंकाळी त्याची अशोक लेलँड ट्रक (क्र. एमएच 20 ईएल 4332) बजाज कंपनी गेटसमोरील बाबा गॅरेजवर दुरुस्तीसाठी उभा केला होता. दरम्यान, त्याच्या मेव्हण्याची प्रकृती बिघडल्याने अंगरख हा अहमदनगरला गेला होता. मात्र नगरहून 10 डिसेंबर रोजी तो परत आल्यावर, त्याला ट्रकच आढळून आला नाही. दरम्यान गॅरेजचालक बाळू मिस्तरी देखील त्या दरम्यान गावाला गेल्याचे सांगितल्याने तो चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करत, संतोष अंगरखने सातारा पोलिसात तक्रार दाखल केली. (Aurangabad Crime News)

 

‘या’ प्रकारे झाला खुलासा

अख्खा ट्रक चोरीला गेल्याने आणि गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी सुरू केला. यादरम्यान त्यांनी ट्रक चोरी झाल्याचा दावा करण्यात आलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या ठिकाणी कुठेही ट्रक चोरीला गेल्याचे दिसून आले नाही. यानंतर पोलिसांनी अंगरखसोबत गॅरेज चालकाची कसून चौकशी केली. यादरम्यान गॅरेजचालक बोलताना अडकला आणि पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरु केला असता याप्रकरणी वेगवेगळ्या संशयितांची नावे समोर आली. या ठिकाणी फिर्यादी फसला आणि त्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी फिर्यादीने आपला गुन्हा मान्य केला आहे.

 

विम्याच्या रकमेसाठी रचला डाव…

संतोष अंगरख यानेच ट्रक प्रतीक सुदाम मिसाळ आणि कल्याण उचित (रा. राजेशनगर) यांच्या मार्फती वाशीमला विकल्याची कबुली दिली. यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून तत्काळ इंशुरन्स कंपनीकडे विम्याच्या रकमेसाठी दावा केला. ट्रक विकून त्या रकमेसह विम्याचे लाखो रुपये उकळण्याचा या आरोपींचा डाव होता. मात्र, त्यापूर्वीच गुन्हे शाखेने कारवाई करून त्यांचा हा डाव उधळवून लावला. या प्रकरणी सातारा ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Web Title :-  Aurangabad Crime News | truck owner false police report of theft for insurance amount

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar |
‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ)

Maharashtra Cabinet Decision | गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपकडून दहशतीचे वातावरण, नाना पटोले यांचा गंभीर आरोप; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन