Maharashtra Cabinet Decision | गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) शिधापत्रिकाधारकांना (Ration Card Holders) 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. तर अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या (Urdhva Pravara Project) कामास गती देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी 5 हजार 177 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली असून यामुळे 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यावर पहिली बैठक (Maharashtra Cabinet Decision) झाली.

 

अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Food Scheme), प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

 

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी 5 हजार 177 कोटींच्या
खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला.
यामुळे 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.

 

प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरु होऊन तो 85 कि.मी. लांब आहे.
नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा 97 कि.मी. आहे. या दोन्ही कालव्यातून 68 हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे.
2027 पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील
सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील 182 गावांना सिंचनाचा लाभ होईल.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | gudi padwa and ambedkar jayanti anand shidha will be available for just 100 rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WPL Title Sponsor | IPL पाठोपाठ WPLला मिळाला ‘हा’ टायटल स्पॉन्सर; बीसीआयसोबत केला 5 वर्षांचा करार

Pune Crime News | नोकरीचे आमिष दाखवून ८ जणांची ११ लाखांची फसवणुक; बीपीओ चालकाला अटक

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या