औरंगाबाद : पडेगावात पुन्हा कचरा प्रश्न पेटला, गाड्यांवर दगडफेक

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन

मागील काही दिवसापासून शहरातील कचऱ्याचा विषय तुर्तास तरी शांत होता. मात्र पुन्हा एकदा पडेगाव येथे शहरातील कचरा टाकण्यावरुन तणाव निर्माण झाला आहे.  नागरिकांनी या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध करत गाड्यांवर दगडफेक केली आहे. यामध्ये एका ट्रकच्या काचा फुटल्या आहेत.
[amazon_link asins=’B06XBCVVDV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db81d270-89be-11e8-a186-bdf3bbbe4fc3′]

दिवसेदिवस शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. नियोजित ठिकाणी कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध केल्यामुळे काही दिवस कचरा टाकण्याचे काम मनपाने थांबवले होते. आज मंगळवारी अोला कचरा घेऊन गाड्या गेल्या असता नागरिकांनी विरोध करीत गाड्यांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी पोलीस बंदोबस्ताची देखील मागणी करण्यात आली.