‘संघर्ष हाच आमच्या जीवनाचा मूलमंत्र’ : पंकजा मुंडे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  संघर्ष करणे हाच जीवनाचा मूलमंत्र असल्याची भावना माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत सोमवारी (ता.२६) व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांचे आयुष्य संघर्षात गेले. फक्त एक टर्म सोडता त्यांना आयुष्यभर सत्तेबाहेरच रहावं लागलं होतं. आता आम्हाला सत्तेबाहेर राहण्याची सवय झाली आहे. सध्या राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण पेटले आहे. मात्र, प्रत्येक नेता आपापल्या सोयीनुसार टीका-टिप्पणी करीत आहे. जो-तो आक्रमक झाल्याचे दिसत आहे, अशा परिस्थितीत पंकजा मुंडें यांनी अतिशय संयमीपणे प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे आणि खासदार प्रतिम मुंडे हे एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने सोमवारी औरंगाबादेत आल्या असता. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या राज्यात ओबीसींचे आरक्षण बचावासाठी आंदोलन होत आहे. यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावीत. अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांनी संसदेत मांडली होती.आता खासदार प्रतिम मुंडे हा विषय सभागृहात मांडत आहे. ओबीसींचा आरक्षणाचा आम्ही वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या लढाईचा आम्ही भाग आहोत. आता जनगणना होणार आहे. यामुळे या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. या जनगणनेतून प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल आणि त्या समुदायाला न्याय देता येईल. काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली होती. रविवारी (ता.२४) जालना येथे ओबीसी मोर्चात ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ अशा आशयाचे बॅनर झळकले. त्याबाबत पंकजा मुंडेना विचारले असता,’ मी जे वाक्य बोललेच नाही, ते खूप गाजले होते. याला सहा वर्षे झाली. ते वाक्य लोकांच्या कानात घुमत असेल, तर यावर काय उत्तर द्यावे हे कळत नाही. हा विषय मागे पडला आहे. आता मी लोकप्रतिनिधी नाही, ज्या ठिकाणी मी जन्मले त्या ठिकाणचे ऋण फेडण्यासाठी मी काम करीत असल्याचे पंकजा यांनी सांगितले. कामाच्या व्यापामुळे आम्ही एकमेकींना भेटू शकत नाही, असे खासदार प्रतिम मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडेंवरील आरोपाचे राजकीय भांडवल केले नसते

पंकजा म्हणाल्या, हा विषय मागे पडला आहेत. सैद्धांतिक, नैतिक, तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या याचे समर्थन करू शकत नाही. अशा प्रकारामुळे एखादे कुटुंब, त्या कुटुंबातील दोष नसलेल्या मुलांना त्रास होतो. नाते म्हणून आणि एक महिला म्हणून याकडे सैद्धांतिक दृष्टीने पाहते. हा विषय कोणाचाही असता, तरीही याचे राजकीय भांडवल केले नसते अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

सतत नोकरभरती थांबविणे अयोग्य

सतत नोकरभरती थांबविणे म्हणजेच इतर समाज आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्‍यावर अन्यायकारक आहेत. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय सकारात्मकपद्धतीने आमच्या सरकारने हाताळला. आता समाजाची घोर निराशा झाली आहे. ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावेत अशी आमची भूमिका आहे. यासह एक ते दोन वेळात नोकरभरती थांबविणे ठिक आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

परळीकर मायेने सांभाळतात

परळीतील लोकांविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, मी परळीच्या लोकांच्या आयुष्यभर ऋणी राहणार आहे. कारण त्यांनी मला ९२ हजार मते देऊन पाडले. लोक खूप हुशार झाले आहेत. त्यांना माहीत आहेत. सत्तेच्या विरोधात असताना काय मागायचे. आता लोक फंड, निधी मागण्यासाठी अथवा बदलीचे सांगत नाही. मात्र कोणता विषयावर बोलायला पाहिजेत हे सांगत मायेने सांभाळतात.