बहिणीशी फोनवर बोलत असतानाच ‘ती’ ओरडली अन् झाले असे काही

कॅनबेरा : वृत्तसंस्था – इस्रायली स्टुडंटची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही इस्रायली स्टुडंट्स असलेली एक मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये फिरण्यासाठी आली होती आणि अचानक या तरुणीचा मृत्यू आेढवल्याची घटना घडली. ती आपल्या बहिणीशी फोनवर बोलत होती. यावेळी ही घटना घडल्याचे समजत आहे. या तरुणीचा मृतदेह बुधवारी सकाळी मेलबर्न विश्वविद्यापीठाच्या परिसरात सापडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर 21 वर्षीय ऐय्या मासरवेच्या हत्यारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जनतेकडे मदत मागितली आहे.
याबाबत माहिती देताना पोलीसांनी सांगितले की, “ती मुलगी स्वतःच्या बहिणीबरोबर फोनवर बोलत होती. ती परदेशातून फोनवर बोलत असतानाच आजूबाजूला काही तरी चुकीचं घडत असल्याचं पाहिल्यानंतर ती जोरात ओरडली आणि तिची ती किंकाळी तिच्या बहिणीनं फोनवर ऐकली. ज्या ठिकाणावरून ती बोलत होती, त्या ठिकाणापासून जवळपास 50 मीटर अंतरावर तिचा मृतदेह सापडला आहे. त्याच स्टॉपवरून ती ट्रामच्या बाहेर निघाली होती.”

ऐय्या मासरवेच्या बहिणीचे नाव स्टॅम्पर आहे. ही घटना घडली तेव्हा ती स्टॅम्परशी फोनवर बोलत होती. याबाबत माहिती देताना स्टॅम्पर म्हणाली, माझी बहीण फोनवर बोलत होती. फोनवर बोलत असतानाच अचानक ती जमिनीवर कोसळली. ती जमिनीवर कोसळण्यासह इतरही आवाज ऐकू आले.”

या घटनेनंतर विद्यार्थिनीचे पालकही आता ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले आहेत. मुख्य म्हणजे पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत असेही समजत आहे. पोलिसांनी स्टॅम्परनं दिलेल्या माहितीच्या आधारे घटनेचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ते पुढील तपास करत आहेत.

https://www.facebook.com/victoriapolice/videos/306254340018760/