Video : टीम इंडियाचा जलवा ! ऑस्ट्रेलियन समर्थकांकडून ‘भारत माता की जय’ची घोषणाबाजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 19 जानेवारी 2021 हा दिवस भारताच्या क्रिकेट इतिहासात कायमस्वरूपी लक्षात राहील. भारतीय संघाने ब्रिस्बेनमधील 32 वर्षांपासून ऑस्ट्रलियाचे असलेले विजयी मैदान मारले आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने 3 गाडी राखुन विजय मिळविला. गाबामध्ये भारताने पहिला कसोटी सामनाही जिंकला. सामन्यादरम्यान अनेकवेळा पावसामुळे खेळातही व्यत्यय आला. परंतु समोर अनेक समस्या असूनही भारतीय संघाने विजय नोंदवून इतिहास रचला.

अखेरच्या दिवशी टीम इंडियाला 324 धावांची गरज होती आणि रोहित शर्मा लवकर बाद झाला. मात्र, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी भागीदारीसह टीम इंडियाने जोरदार वापसी केली. शेवटी ऋषभ पंतने नाबाद 89 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे समर्थक आपल्या घरच्या संघाच्या कामगिरीने नाराज होते. दरम्यान, काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी टीम इंडियाला पाठिंबा दर्शविला आणि ‘भारत माता की जय’ ही घोषणाबाजी करतानाही दिसले. हा व्हिडिओ त्वरित सोशल मीडियावर व्हायरल झाला.