Auto Debit Transaction | जर ऑटो-डेबिटने भरत असाल वीज, पाणी आणि LPG चे बिल तर RBI चा ‘हा’ नियम परिणाम करू शकतो, जाणून घ्या कसा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Auto Debit Transaction | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चा ऑटो-डेबिट ट्रांजक्शन (Auto Debit Transaction) चा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून अंमलात आला आहे. हा नियम सांगतो की, बँकेने प्रत्येक ऑटो जनरेटेड ट्रांजक्शनपूर्वी ग्राहकांला एक मेसेज (message) पाठवून कल्पना द्यावी. ग्राहकाची मंजूरी मिळाल्यानंतरच बँक बिलाचे ऑटो-डेबिट करू शकते. मात्र, हा नियम सर्वांसाठी नाही. जे ग्राहक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वॉलेट आणि युपीआय ट्रांजक्शनद्वारे ऑटो-डेबिट (debit card, credit card, wallet and UPI transactions) करतात, त्या ग्राहकांना हा नियम लागू होतो.

ज्या ग्राहकांनी नेट बँकिंगद्वारे वीज, पाणी, एलपीजी, फोन रिचार्ज, ओव्हर द टॉप अप इत्यादी (electricity, water, LPG, phone recharge, over the top up, etc.) बिल भरण्याची सिस्टम फिक्स केली आहे, त्यांच्यावर हा नवीन नियम लागू होईल. जर तुम्ही ऑटो-डेबिटने सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (systematic investment plan) मध्ये किंवा SIP चे पैसे जमा करत असाल तर त्यावर या नियमाचा परिणाम होणार नाही. याचे कारण हे आहे की बहुतांश एसआयपीचे ट्रांजक्शन नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस (NACH) ने होते जे थेट बँकेतून ट्रांजक्शन होते.

यासाठी ऑटो-डेबिटच्या नवीन नियमाचा परिणाम एसआयपीच्या पेमेंटवर होणार नाही. जे गुंतवणुकदार इन्व्हेस्टमेंट अ‍ॅप (investment apps) जसे की जरोधा, अपस्टॉक, ग्रो, मोतीलाल ओसवाल, एंजल ब्रोकिंग आणि इतर इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मवरून एसआयपी पेमेंट करतात, त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही (Jarodha, Upstock, Grow, Motilal Oswal, Angel Broking and other investment platforms will not be affected).

 

पेमेंट अ‍ॅपवाल्यांनी लक्ष द्यावे

याबाबत जरोधाचे प्रवक्ते (Jarodha spokesperson) म्हणतात, जरोधा एनपीसीआय एनएसीएच प्लॅटफॉर्म (NPCI NACH platform) वर ई-मँडेट (e-mandate facility) फॅसिलिटीचा वापर करते आणि आपल्या ग्राहकांना ऑटो-डेबिट सेटअप (auto-debit set up) करण्याची परवानगी देते. यामुळे या ग्राहकांच्या बँक अकाऊंटमधून ऑटो-डेबिट होते, यासाठी RBI च्या नियमाचा परिणाम होणार नाही.

नवीन आणि जुने जेवढे ऑटो-डेबिट आहेत, ते सर्व पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील (new and old auto-debits, will all continue as before). येथे ई-मँडेटचा अर्थ RBI आणि NPCI च्या त्या नियमाशी आहे ज्यामध्ये एखाद्या बिझनेसला आपल्या क्लाएंटकडून 5,000 रुपयांपर्यंतचे पेमेंट घेण्याची मंजूरी मिळालेली असते. (Auto Debit Transaction)

5,000 पेक्षा कमी पेमेंट असेल तर चिंता नाही
जर पेमेंट 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँकांना ते प्रमाणित (ऑथेंटिकेशन) करावे लागेल कारण या रक्कमेपेक्षा जास्त ट्रांजक्शनसाठी बँकांना ऑटो-डेबिटची परवानगी नाही. सेबीने सुद्धा यासाठी विशेष नियम केला आहे.

सेबी कोणत्याही इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म किंवा अ‍ॅपद्वारे आपल्या स्टॉक ब्रोकरेज फर्मला क्लाएंटकडून डेबिट किंवा
क्रेडिट कार्डद्वारे पैसे घेण्याची परवानगी देत नाही.
नव्या नियमानुसार, यूजरला वन टाइम रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या माध्यमातून ई-मँडेट फॅसिलिटीचा वापर
करावा लागेल ज्यासाठी यूजरला एक ओटीपी नोंदवावा लागेल.

यासोबत ग्राहकांला बँक किंवा कार्ड किंवा युपीआय डिटेल भरावी लागेल.
ग्राहक आपल्या बिलाचे पेमेंट रोखू सुद्धा शकतो, आपला इच्छेप्रमाणे बदलू शकतो.
यासाठी जर तुम्ही बिल भरत असाल, नेटफ्लिक्सचे पैसे देत असाल किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मचे पैसे भरत असाल
तर तुम्हाला एक ई-मँडेट सेट करावा लागेल. यासाठी बँकेकडून पाठवलेला ओटीपी नोंदवावा लागेल.

 

काय आहे ऑथेंटिकेशनचा नवीन नियम

आरबीआयने हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू केला आहे. ऑथेंटिकेशनचा अर्थ प्रमाणीकरण आहे.
ज्यामध्ये एखाद्या ट्रांजक्शनसाठी ग्राहकाकडून मंजूरी मिळेल. येथे ग्राहक देत असलेल्या मंजूरीलाच ऑथेंटिकेशन समजा.
या प्रक्रियेंतर्गत ज्या बँकेत तुमचे अकाऊंट आहे, त्या बँकेतून ऑटो-डेबिटच्या 24 तास अगोदर तुम्हाला एक मेसेज येईल.
यामध्ये विचारले जाईल की अमूक-अमूक ऑटो-डेबिट करावे किंवा नाही.

जर तुम्ही मंजूरी दिली, तर पैसे आपोआप (auto-debit) खात्यातून कापले जातील.
हे नोटिफिकेशन मोबाइल फोनवर एसएमएस आणि ईमेलद्वारे पाठवले जाईल.
या नोटिफिकेशनमध्ये बिझनेस (ज्यांना पैसे पाठवले जाणार आहेत) चे नाव, व्यवहाराची रक्कम,
डेबिट होण्याची तारीख, व्यवहाराचा रेफरन्स नंबर इत्यादी असेल.

 

Web Title :- Auto Debit Transaction | if you pay electricity water and lpg bills through auto debit this rbi rule can have an effect know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Anti Corruption | 10 हजाराची लाच घेताना पुणे मनपातील 2 कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 85 रुग्णांचे निदान, लसीकरणाचा 20 लाखांचा टप्पा पार, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Anti Corruption | बारामतीमध्ये महिलेकडून 30 हजाराची लाच घेताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात;