Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 85 रुग्णांचे निदान, लसीकरणाचा 20 लाखांचा टप्पा पार, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. मात्र मागील काही दिवसांपासून नवीन आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली असली तरी नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 85 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 85 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना (Pimpri Corona) बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 74 हजार 176 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 61 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 568 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 894 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 894 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

लसीकरणाचा 20 लाखांचा टप्पा पार

पिंपरी चिंचवड शहराने लसीकरणाचा 20 लाखांचा टप्पा पार केली आहे.
रविवारी (दि.03) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 24 हजार 017 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 20 लाख 10 हजार 348 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona | In the last 24 hours, 85 patients of ‘Corona’ have been diagnosed in Pimpri Chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Anti Corruption | बारामतीमध्ये महिलेकडून 30 हजाराची लाच घेताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात;

Aamir Khan | आमीर खानच्या ‘त्या’ जाहिरातीवरुन ‘वादंग’, युझर्स म्हणाले – ‘तू हिंदू विरोधी आहेस’ (व्हिडिओ)

Maharashtra Rains | पुढचे 5 दिवस कोकणासह घाट परिसरात मुसळधार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट