काय सांगता ! होय, अ‍ॅटो रिक्षा रस्त्यावर पलटली, आतमधून निघाले 2 पोत्यात 3 कोटी रूपये, सर्वत्र खळबळ

मलाप्पुरम : वृत्तसंस्था – केरळमध्ये मलाप्पुरमच्या कोट्टाकल येथे ऑटो-रिक्षामधून 2 मोठमोठ्या पिशव्यांमध्ये भरलेले 3 करोड रूपये जप्त करण्यात आले आहेत. एवढी मोठी रक्कम बेवारस सापडल्याने पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, हे सर्व पैसे ऑटो-रिक्षामध्ये होते. ही रिक्षा रस्त्यावरून धावत असताना अचानक नियंत्रण सुटल्याने उलटली. कारण दोन बाईकस्वार ही कॅश हिसकावण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिक लोकांनी ऑटो रिक्षातून नोटा मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी या सर्व नोटा ताब्यात घेतल्या आणि त्या बँकेत नेल्या. तेथे या सर्व नोटा मोजल्या असता ते तब्बल 3 करोड रूपये होते. पोलिसांनी या प्रकरणी थनूर येथून शफील आणि इस्माइल यांना अटक केली आहे. हे दोघेसुद्धा ऑटो-रिक्षा ड्रायव्हर आहेत. ऑटो रिक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश अखेर कुठून आली, याचा शोध पोलीस घेत आहेत.