मुलांच्या आठवणीमुळं 42 वर्षीय महिला डॉक्टर करतये परदेशी लोकांची ‘देखभाल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायसची बाधा होउ नये म्हणून अनेकजण विविध प्रकारे काळजी घेत आहेत. दुसरीकडे मात्र, पोलिस, पत्रकार, डॉक्टर, नर्स, अत्यावश्यक सेवा पुरविणारे सर्व जण झोकून काम करीत आहेत. विशेषतः प्रत्येक शहरातील रुग्णालयांतले डॉक्टर अविरत काम करत आहेत. गुरुग्राममधील डॉक्टर सुशीला कटारिया मागील काही दिवसांपासून परिवारापासून दूर राहत कर्तव्य बजावत आहेत.

कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. गुरुगृामध्ये काही दिवसांपूर्वी इटलीतील 14 परदेशी नागरिकांना दाखल करण्यात आले होते. या नागरिकांच्या तब्येतीची काळजी घेण्याची जबाबदारी डॉ. कटारिया यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

इटलीचे 14 प्रवासी हॉस्पिटलमध्ये येत आहेत, असे समजल्यानंतर त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली. डॉक्टर म्हणून आमच्यासाठी देखील ही परिस्थिती नवीनच आहे. पण वैद्यकीय सेवेत असताना मी कोणत्याही कामाला नाही म्हणून शकत नाही. लोकांची सेवा करणं हे माझं काम आहे. डॉ. कटारिया यांनी सांगितले. गेले 17 दिवस डॉ. कटारिया हॉस्पिटलमध्येच आहेत. परदेशी रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत असल्याचे समजताच मी माझ्या पतीला फोन करुन कल्पना दिली. त्यांची तब्येतही बरी नसल्यामुळे त्यांना एका वेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या परिस्थितीतही त्यांनी मला पाठींबा दिला. आमची अजुनही भेट झालेली नाही.

दिवसांत जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा आम्ही फोन किंवा व्हॉट्स अपवर बोलत असतो. डॉ. कटारिया यांचा 16 वर्षाचा मुलगा आणि 13 वर्षाची मुलगी हे त्यांच्यासोबतच राहत आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे.सध्याच्या परिस्थितीत मी त्यांना भेटू शकत नाही. बरेच दिवस झाले मी माझ्या मुलांना मिठी मारु शकले नाहीये.

त्यांच्या खोलीच्या दारालाही मला स्पर्श करता येत नाहीये. माझ्या मुलीच्या चेहर्‍यावर नेहमी हा प्रश्न असतो की, आई हे सगळं तु का करतेयस? पण सध्या तरी याचे उत्तर माझ्याकडे नाही. कोरोनामुळे सध्या देशात भीतीचे वातावरण असलं तरीही डॉ. सुशिला कटारिया आणि त्यांच्यासारख्या अनेक डॉक्टरांचे काम हे दाद देण्यासारखे आहे.