Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘आयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; लिंजडस् स्पोर्ट्स क्लब संघाला विजेतेपद !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अप्पासाहेब उभे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ‘आयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament) लिंजडस् स्पोर्ट्स क्लब संघाने युनायटेड इलेव्हन संघाचा ८० धावांनी सहज पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कुल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात विपुल खैरे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर लिजंडस् स्पोर्ट्स क्लब संघाने विजेतेपद मिळवले. पहिल्यांदा फलंदाजी करताना लिजंडस् स्पोर्ट्स क्लबने २० षटकामध्ये १७४ धावा धावफलकावर लावल्या. गिरीष कोंडे याने २४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावांची स्फोटक खेळी केली. विपुल खैरे (नाबाद ३७ धावा), हृषीकेश आगाशे (३४ धावा) आणि नचिकेत कुलकर्णी (२० धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने समाधानकारक धावसंख्या उभी केली. या आव्हानासमोर युनायटेड इलेव्हनचा डाव ९४ धावांवर गडगडला. लिजंडस्च्या विश्‍वजीत जाधव (३-२६), विपुल खैरे (२-१९) आणि अमित गणपुळे (२-२२) या गोलंदाजी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एचआर कॅपिटाचे स्नेहलकुमार कासार आणि स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गिरीष ओक, अमित उमरीकर, आदित्य पाळंदे, शंतनु आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या लिजंडस् स्पोर्ट्स क्लब आणि उपविजेत्या युनायटेड इलेव्हन संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान प्रफुल्ल मानकर (फ्रेन्ड्स क्लब, २०५ धावा आणि ६ विकेट), सर्वोत्कृष्ट फलंदाज गणेश आंब्रे (फार्मा इलेव्हन, २२१ धावा), हितेश माल (शिवनेरी क्लब, १४ विकेट) ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः

लिजंडस् स्पोर्ट्स क्लबः २० षटकात ८ गडी बाद १७४ धावा (गिरीष कोंडे ५१ (२४, ८ चौकार, १ षटकार),
विपुल खैरे नाबाद ३७, हृषीकेशआगाशे ३४, नचिकेत कुलकर्णी २०, विनय शिंदे २-२७)
वि.वि. युनायटेड इलेव्हनः १४.५ षटकात १० गडी बाद ९४ धावा (हर्षल शिंदे १६, विश्‍वजीत जाधव ३-२६,
विपुल खैरे २-१९, अमित गणपुळे २-२२); सामनावीरः विपुल खैरे;

 

Web Title :  Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | Ayodhya Trophy Summer
League T20 Cricket Tournament; League of Legends Sports Club team wins !!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा