Ayurveda : फ्लू-व्हायरसपासून वाचवतात ‘या’ 5 वनस्पती, इम्युनिटी होते मजबूत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्याशी संबंधीत कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी आयुर्वेदीक उपचार सर्वात चांगले मानले जातात. सध्या कोरोनाचा काळा सुरू असल्याने इम्युनिटी मजबूत असणे खुप आवश्यक झाले आहे. तज्ज्ञ देखील इम्युनिटी वाढवण्यासाठी विविध प्रकारचे आयुर्वेदिक उपाय सांगत आहेत. यासाठीच आपण त्या 5 वनस्पतींबाबत जाणून घेवूयात ज्यामुळे इम्युनिटी मजबूत होते आणि शरीर संसर्गापासून दूर राहाते.

या आहेत त्या वनस्पती…
1 अश्वगंधा
इम्युनिटी वाढवण्यासाठी अश्वगंधा खुप लाभदायक आहे. तसेच याच्या सेवनाने शरीराची सूज आणि जळजळ दूर होते, तणाव आणि चिंता, झोपेच्या समस्या, ब्लड शुगर नियंत्रण, इत्यादीवर हे उपयोगी आहे.

2 हळद
हळद इम्युनिटी वाढवण्याचे काम करते. तसेच हळदीच्या सेवनान कॅन्सर, हृदय रोग, खोकला आणि सर्दी इत्यादीवर गुणकारी आहे.

3 ब्राह्मी
ब्राह्मीला ब्रेन बूस्टर म्हणून ओळखले जाते. याशिवाय इम्युनिटी वाढते आणि अनेक आजार दूर राहतात.

4 लिंबू
विविध गुणामुळे लिंबाला इम्युनोमोड्यूलेटर म्हटले जाते. म्हणजे यामुळे इम्युनिटी वाढते. विविध आजारावर लिंबू उपयोगी आहे.

5 तुळस
इम्युनिटी वाढवण्यासाठी तुळस सर्वात चांगले औषध मानले जाते. तुळस अस्थमा, ब्रोंकायटिस सारख्या श्वसन संसर्गावरील उपचारात गुणकारी आहे. याशिवाय ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.