Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

नवी दिल्ली : धावपळीच्या जीवनशैलीमुहे अनेक लोक आपल्या दिनचर्येकडे लक्ष देऊ शकत नाहीत. याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासाठी आयुर्वेदात सकाळचे काही विशेष नियम (Ayurveda Morning Routine) सांगितले आहेत जे जीवनशैली चांगली बनवतात आणि तुमच्यात आत्मविश्वास, नियमीतता आणि संतुलनासारखे गुण सुद्धा विकसित (Ayurveda Morning Routine) करतात.

ही कामे कोणती ते जाणून घेवूयात…

1 सकाळी लवकर उठा –

आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात म्हणजे सूर्योदयापूर्वी दोन तास आधी उठा.

2 चेहर्‍यावर पाणी घ्या –

सकाळी उठल्यावर प्रथम चेहर्‍यावर पाणी टाका. विशेषता डोळ्यावर हलकेच पाणी मारा.

3 पोट स्वच्छ ठेवा –

आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी बाथरूमजा जाणे चांगले मानले जाते. आयुर्वेदात एकवेळ सकाळी आणि एकदा रात्री शौचाला जाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे सकाळी हलके आणि बरे वाटते.

4 दात स्वच्छ ठेवा –

आयुर्वेदात दात आणि जीभ स्वच्छ ठेवण्याला खुप महत्व आहे. दाताच्या अस्वच्छतेमुळे बॅक्टेरिया तयार होतात आणि आजाराला निमंत्रण मिळते.

5 गुळणी –

आयुर्वेदानुसार डेली रूटीनमध्ये सुद्धा गुळणी केली पाहिजे. गुळणी मीठाच्या कोमट पाण्याने केली जाते.

6 शरीराची मालिश –

आपल्या रूटीनमध्ये ऑयलिंग म्हणजे कोमट तेलाने मालिशची सवय करा. यामुळे शरीराला मॉयश्चरायझर मिळते.

7 हलका व्यायाम करा –

आयुर्वेदानुसार दिवसाची सुरुवात हलक्या व्यायामाने करावी.

8 आहाराकडे लक्ष द्या –

सकाळचा नाश्ता करा. फळ, भाज्या, ज्यूस, दही आणि कडधान्याने दिवसाची सुरूवात करा.

हे देखील वाचा

Samruddha Jeevan Scam | ‘समृद्ध जीवन’ घोटाळ्यातील महत्त्वाच्या कागदपत्रांचा दुसरा साठा CID कडून जप्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ayurveda Morning Routine | ayurveda approved morning routine you must follow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update