एका डोळयानं पाहू नाही शकत ‘बाहुबली’चा ‘भल्लालदेव’ राणा डग्गुबाती, अभिनेत्यानं स्वतः केला खुलासा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बाहुबली मध्ये भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबाती यानं अलीकडेच गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत साखरपुडा केला आहे. तेव्हा पासून हे कपल चांगलंच चर्चेत येताना दिसत आहे. अशातच आता राणाची एक मुलाखत समोर आली आहे. यात राणानं खुलासा केला आहे की, त्याला एकाच डोळ्यानं दिसतं.

View this post on Instagram

And she said Yes 🙂 ❤️#MiheekaBajaj

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

राणानं सांगितलं आहे की, तो फक्त डाव्या डोळ्यानंच पाहू शकतो. एका रिपोर्टनुसार डोळ्याच्या प्रॉब्लेमनं परेशान एका महिलेलाल समजावून सांगताना राणानं एका शोमध्ये याचा खुलासा केला होता. राणा त्या महिलेला म्हणतो की, त्याला उजव्या डोळ्यानं दिसत नाही. त्याला फक्त डाव्याच डोळ्यानं दिसतं. हा डोळादेखील कोणीतरी त्याला मेल्यानंतर डोनेट केला होता. तो सांगतो जर त्यानं डावा डोळा बंद केला तर तो कोणालाही पाहू शकत नाही.

राणानं बुधवारी (दि 20 मे) मिहिकासोबत साखरपुडा केला आहे आणि ऑफिशियली एंगेज्ड झाला आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर राणानं पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोषाख घातला होता. त्याची लेडीलव मिहिकानं देखील पारंपरिक नारंगी आणि गुलाबी रंगाची साडी घातली होती. इंस्टावरून फोटो शेअर करत राणानं खास कॅप्शनही दिलं होतं. राणा म्हणतो, आता हे ऑफिशियल आहे.

View this post on Instagram

And it’s official!! 💥💥💥💥

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

राणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर त्याच्या हाथी मेरे साथी या सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या पुलकित सम्राटही दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like