Baba Ramdev | ‘सलमान खान ड्रग्स घेतो, तर आमिर…; बाबा रामदेव यांची बॉलिवूडवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. ते अनेकवेळा असे वक्तव्य करतात त्यामुळे ते वादाच्या भवऱ्यात अडकतात. नुकतंच आता बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खानबाबत (Amir Khan) एक वक्तव्य करत संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

 

नेमके काय म्हणाले बाबा रामदेव?
मुरादाबाद याठिकाणी पार पडलेल्या नशामुक्त भारत अभियानामध्ये (Drug Free India Campaign) बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढवला. तर दुसरीकडे त्यांनी बॉलिवूडमधील कलाकारांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सलमान खान आणि आमिर खान यांच्याबाबत धक्कादायक वक्तव्ये केली आहेत. बॉलिवूड सेलेब्रेटींवर निशाणा साधत ते म्हणाले, शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा नुकतंच ड्रग्स घेत असल्याच्या कारणामुळे तुरुंगात जाऊन आला. तर सलमान खानसुद्धा ड्रग्स घेतो. आमिर खानचं काही माहिती नाही. कित्येक मोठमोठे कलाकार ड्रग्स घेतात. बॉलिवूडमध्ये सर्वत्र ड्रग्स (Drugs) घेणारे आहेत असे म्हणत त्यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

यावेळी बाबा रामदेव यांनी लोकांना व्यसनमुक्त आयुष्याचं आवाहन केले.
तसेच यावेळी त्यांनी लोकांना विडी, सिगारेट, तंबाखू, दारू इत्यादी गोष्टींचं सेवन न करण्याचं आवाहन केलं.
संपूर्ण देश व्यसनमुक्त झाल्यास स्वामी दयानंद (Swami Dayanand) यांचं स्वप्न पूर्ण होईल असंदेखील ते यावेळी म्हणाले. यासाठी प्रत्येक व्यक्तीला प्रयत्न करावा लागेल.

 

Web Title :- Baba Ramdev | baba ramdev statement on salman khan and aamir khan see report

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिंदेचा वापर शिवसनेविरूद्ध ’कॉन्ट्रॅक्ट किलर’ प्रमाणे, त्यांच्या अधःपतनाची ही सुरुवात, कुठेतरी ब्रेक लावायला हवा

MNS Sandeep Deshpande | मनसेचा शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार, सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भाजपला इशारा, म्हणाले-‘हीच शिवसेना आणि मशाल तुम्हाला…’