Babanrao Dhakane Passed Away | माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन; उद्या पाथर्डीत अंत्यसंस्कार

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (Babanrao Dhakane Passed Away) यांचे गुरुवारी रात्री वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. निमोनिया झाल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात तीन आठवड्यांपासून उपचार सुरू होते. रात्री त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन (Babanrao Dhakane Passed Away) झाले. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. एस. दीपक यांनी ही माहिती दिली.

त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक पर्यंत ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव, तालुका पाथर्डी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. (Babanrao Dhakane Passed Away)

दिवंगत बबनराव ढाकणे यांचा अल्प परिचय

  • १९५१ मध्ये बबनराव ढाकणे विद्यार्थी दशेतच दिल्लीत जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटले होते.
  • गोवामुक्ती सत्याग्रहात भाग घेतला.
  • पाथर्डी तालुक्यातील विकासाबाबत विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली.
  • बाजार समितीपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. नंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा टप्पे त्यांनी यशस्वीपणे गाठले.
  • महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. जनता पक्षाचे अध्यक्ष होते.
  • पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा राज्यमंत्री होते.
  • जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले.
  • ऊस तोडणी कामगार, शेतकरी, बेरोजगारी असे विविध मुद्दे त्यांनी हाताळले.
  • पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा सहवास दिवंगत ढाकणे यांना लाभला.
  • बबनराव ढाकणे यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळा पाथर्डीत उभारला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | परदेशातील पार्सलमध्ये ड्रग्स सापडल्याचे सांगून पुण्यातील तरुणाला लाखोंचा गंडा