×
HomeUncategorizedBabar Azam | बाबर आझमने रचला इतिहास! विराट कोहलीच्या 'त्या' विक्रमाशी केली...

Babar Azam | बाबर आझमने रचला इतिहास! विराट कोहलीच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) इंग्लंडविरूद्धच्या (England) सामन्यात इतिहास रचत एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. असा विक्रम करणारा बाबर आझम (Babar Azam) हा पहिलाच पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला आहे. हा विक्रम करून बाबर आझम रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) लाईनमध्ये शामिल झाला आहे. बाबर आझमने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 3 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3,000 धावा करणारा बाबर आझम पहिलाच पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला आहे.

 

विराटच्या विक्रमाशी बाबरची बरोबरी
बाबर आझमने (Babar Azam) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 81 व्या डावात 3 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशाप्रकारे या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 3 हजार धावा करण्याच्या बाबतीत बाबरने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. विराट कोहलीने देखील 81 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यामुळे आता विराट कोहली आणि बाबर संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (Martin Guptill) आहे. त्याने 101 डावांत 3 हजारांचा टप्पा गाठला होता.

 

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारे खेळाडू
विराट कोहली (इंडिया) – 81 डाव
बाबर आझम (पाकिस्तान) – 81 डाव
मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) – 101 डाव
रोहित शर्मा (इंडिया) – 108 डाव
पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) – 113 डाव

 

Web Title :- Babar Azam | babar azam joins elusive list of t20i batters as he equals virat kohli record of 3000 runs beats rohit sharma

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Women Asia Cup 2022 | आजपासून रंगणार महिला आशिया चषकाचा थरार; इंडिया वि. श्रीलंका होणार पहिली लढत

Eng vs Pak | इंग्लंड-पाकिस्तान सामन्यात बॉल लागल्यामुळे भर मैदानात कळवळला अम्पायर, Video आला समोर

World Table Tennis Championships | जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, उझबेकिस्तानचा केला पराभव

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News