Babita and Randhir Kapoor | तब्बल 35 वर्षांनी करीनाचे पालक रणधीर कपूर आणि बबिता राहणार एकत्र; ‘या’ कारणामुळे झाले होते वेगळे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तब्बल 35 वर्षांनी जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर आणि एकेकाळी अभिनेत्री असलेल्या बबीता (Babita and Randhir Kapoor) यांच्यातील दुरावा आता संपला आहे. ते पुन्हा एकत्र राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी प्रेम विवाह केला होता. मात्र काही कारणांमुळे घटस्फोट न घेता मागील 35 वर्षापासून ते एकमेकांपासून वेगळे राहत होते. आता हे दोघेही एकत्र आल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. (Babita and Randhir Kapoor)

 

1971 मध्ये रणधीर व बबीता यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 1988 मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. तर आता तब्बल 35 वर्षांनी पुन्हा ते एकत्र आले आहेत. त्यांच्या या निर्णयाने कुटुंब त्याचबरोबर चाहते देखील खुश झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बबीता या सर्वसामान घेऊन पतीच्या म्हणजेच रणधीर यांच्या वांद्रे येथील घरात राहण्यासाठी पोहोचल्या आहेत. हे दोघे एकत्र आल्याने त्यांची मुलं देखील आनंदित असल्याचे दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रणधीर हे अस्वस्थ आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी आता बबीता आल्याचे सांगण्यात येत आहे. (Babita and Randhir Kapoor)

या दोघांची ओळख 1969 मध्ये आलेल्या ‘संगम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
यानंतर या दोघांनी 6 नोव्हेंबर 1971 रोजी लग्न गाठ बांधली. 80 च्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नव्हते.
याच गोष्टीमुळे अस्वस्थ होऊन त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली. त्यांच्या याच दारू पिण्याच्या सवयीमुळे बबीता यांना त्रास होऊ लागला आणि दोघांमध्ये अनेक वाद निर्माण झाले.
त्याचबरोबर मुलींनी चित्रपटात काम करू नये असे रणधीर यांना वाटत होते.
या सगळ्या गोष्टींना कंटाळून अखेर 1988 साली बबीता यांनी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वेगळे राहायला सुरुवात केली होती.
त्यानंतर आता तब्बल 35 वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले आहेत.

 

Web Title :- Babita and Randhir Kapoor | finally the 35 year gap is over kareenas parents randhir kapoor and babita live together

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | चोरीला गेलेले दागिने महिलेला केले परत, कोंढवा पोलिसांची कामगिरी

Suspended PSI Arrested | विनयभंग प्रकरणातील फरार पोलीस उपनिरीक्षकाला अटक, एवढ्या दिवसांची पोलीस कोठडी

Pune Pimpri Chinchwad Crime | वाकडमध्ये कोयता गँगची दहशत, फिनिक्स मॉलमधील माथाडी कामगारांना मारहाण; 7 जणांवर FIR