महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी, उल्लंघन केल्यास १ लाख रुपये दंड

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र सरकारने गुरुवारपासून (दि.४) महराष्ट्रातील सर्व हुक्का पार्लवर बंदी घातली आहे. गुजरातनंतर अशा प्रकारची बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. याची अंमलबजावणी ताबडोब लागू होणार असून याचे उल्लंघन केल्यास १ लाख रुपयाचा दंड करण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये हे विधेयक मंजुर झाल्यानंतर सरकारने ही अधिसूचना जारी केली होती.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’daca0147-c948-11e8-8d45-05d34e0ffe67′]

हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुधारीत कायद्यानुसार याचे उल्लंघन करणाऱ्यांवर १ लाख रुपये दंड आणी तीन वर्षांचा कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e06e18b4-c948-11e8-9d26-3327a01e126f’]

दरम्यान, गृह विभागाकडून अधिसुचना जारी केल्यापासून ताबडतोब बंदी लागू करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. याची प्रभावी अंमलबजावणी आणि हुक्का पार्लरवर बंदी करण्याची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांची असणार आहे. डिसेंबर २०१७ मध्ये कमला मिल्समध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागली होती. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा गृह विभागाने हुक्का पार्लरवरील कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करीत होती. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यात हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे.