तुम्हाला लक्षात देखील येत नाही आणि बँक वसूल करते अनेक प्रकारची ‘फीस’, जाणून घेतल्यास व्हाल ‘चकित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आजकाल बँकेत खाते ठेवणे फार महत्वाचे आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ थेट बँक खात्यात ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का की बँक तुमचे खाते चालवण्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारतात? बँका प्रत्येक सेवेसाठी ग्राहकांकडून शुल्क घेते. बचत खात्यात किमान बॅलन्स ठेवण्यापासून ते बँक खाते बंद करण्यापर्यंत बँक तुमच्या खात्यातून शुल्क वजा करते. आज अशाच काही शुल्कांबद्दल जाणून घेणार आहोत, जे बँका तुमच्याकडून आकारतात, पण त्याची माहिती सहसा ग्राहकांना देत नाहीत.

रक्कम जमा केल्यास शुल्क 

अशा काही बँका आहेत ज्या कॅश डिपॉजिट करण्यासाठी शुल्क आकारतात. बर्‍याच बँकांमध्ये पहिले काही व्यवहार विनामूल्य असतात. पण नंतर त्यांच्या व्यवहारावर पैसे द्यावे लागतात. ते प्रति व्यवहार ५०-१५० रुपये असू शकतात.

निधी हस्तांतरण 

NEFT आणि RTGS वर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु Immediate Payment Servic (आयएमपीएस) व्यवहारांवर अजूनही बँका शुल्क आकारतात. सामान्यत: शुल्क १ ते २५ रुपयांपर्यंत असते.

एटीएम, डेबिट कार्ड आणि चेकवर शुल्क 

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँक एका महिन्यात एटीएमकडून ५ व्यवहारांपर्यंत कोणतेही शुल्क आकारत नाहीत. परंतु त्यापेक्षा अधिक व्यवहार असल्यास शुल्क आकारले जाईल. ५ पेक्षा जास्त व्यवहार झाल्यास बँक प्रत्येक व्यवहारासाठी ८-२० रुपये आकारतात. हे कोणत्या प्रकारचे व्यवहार आहे यावर अवलंबून आहे.

याशिवाय तुमचे कार्ड हरवले तर त्या बदल्यात नवीन कार्ड दिल्यावरही तुम्हाला ५०-५०० रुपये फी आकारली जाते. एटीएम विसरल्यास नवीन एटीएम पिन घेण्यासाठी शुल्क आकारले जाते. चेक क्लिअरिंगवरही बँक प्रति चेक १५० रुपये घेतात.

सतर्कता आणि सूचना
बँक एसएमएस अलर्ट सुविधा देखील देते. ज्यामध्ये बँक ही सेवा विनामूल्य देत नाही. उलट यासाठीही महिन्याला १५ रुपये आकारते.

चेकचे स्टेटस जाणून घेण्यासाठीही शुल्क आकारले जाते 
जर तुम्हाला तुमच्या धनादेशाची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर बर्‍याच खाजगी बँक तुमच्याकडूनच यासाठी शुल्क आकारतात. या सेवेसाठी बँक २५ रुपये शुल्क आकारते. सामान्यत: चालू शुल्काची स्थिती जाणून घेतल्यावर ही फी द्यावी लागत नाही, परंतु तुम्हाला जुन्या चेकची स्थिती माहिती करून घ्यायची असल्यास तुम्हाला ही फी भरावी लागते.

बचत खात्यात (Non-maintenance of minimum balance) काही शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास बँक तुमच्याकडून दंड वसूल करते. प्रत्येक बँक वेगवेगळे दंड आकारते, जसे की एचडीएफसी बँक ३०० रुपये अधिक कर आकारते.