मुदत ठेवींवर ‘या’ बँका देताहेत 8 % व्याज, ज्येष्ठ नागरिकांना जास्तच फायदा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नागरिकांमध्ये फिक्स्ड डिपॉजिट गुंतवणुकीसाठी सर्वात पॉप्युलर पर्याय मानला जातो. भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँकेसह अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडी रेट्सवर 50 बेसिस पॉइंटचा अतिरिक्त लाभ देतात. परंतु, मागील काही काळात या एफडी दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अशावेळी आज आम्ही तुम्हाला काही अशा स्मॉल फायनान्स बँकांबाबत सांगणार आहोत, ज्या कमी व्याजदराच्या या काळात सुद्धा चांगल्या दराने एफडीची सुविधा देतात. जाणून घेवूयात याबाबत…

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे एफडी दर 1 मे 2020पासून प्रभावी आहेत. या बँकेत 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4.5 टक्के आणि 46 दिवसांपासून 90 दिवसांच्या एफडीवर 5.5 टक्के दराने व्याज मिळत आहेत. अशाचा प्रकारे 91 दिवसांपासून 6 महीने आणि 6 महिने एक दिवसापासून 9 महिन्यापर्यंत अनुक्रमे 6 आणि 6.75 टक्के दराने व्याज मिळत आहे. 9 महिने एक दिवसापासून एक वर्ष एक दिवसासाठी हा दर 7 टक्के आहे. 1 वर्षापासून 2 वर्षासाठी 7.25 टक्के, 2 ते 3 वर्षा आणि 3 ते 5 वर्षापर्यंत एक दिवसाच्या कमी कालवधीसाठी व्याज अनुक्रम 7.65 टक्के आणि 7.75 आहे. 5 वर्षात मॅच्युअर होणार्‍या डिपॉझिटवर कामल 8 टक्के दराने व्याज मिळते. हे दर 1 सप्टेंबर 2020 पासून लागू आहेत.

फिनकेयर स्मॉल फायनान्स बँक
या बँकेचे व्याजदर 3 सप्टेंबरपासून लागू आहेत. येथे 7 दिवसापासून 7 वर्षापर्यंतच्या विविध कालावधीसाठी 4 ते 8 व्याज मिळते. 1 वर्षापेक्षा कमी मॅच्युर होणार्‍या एफडीवर 6.5 टक्के व्याज मिळत आहे. 12 महिन्यापासून 18 महिन्यांसाठी हे 7.5 टक्के आहे. 18 महिने एक दिवसांपासून 24 महिन्यांसाठी हे 7.6 टक्के आहे. ही बँक एफडीवर कमाल 8 टक्केच्या दराने व्याज 36 महिने एक दिवसांपासून 42 महिन्याच्या कालावधीसाठी देते.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे हे एफडी रेट्स 3 जुलैपासून प्रभावी आहेत. या बँकेत तुम्हाला 7 दिवसांपासून 45 दिवस आणि 46 दिवसांपासून 90 दिवसांपर्यंत एफडीवर अनुक्रमे 3.75 आणि 4.25 टक्के व्याजदर मिळतो. 181 दिवसांपासून 364 दिवसांच्या एफडीवर 7 टक्क्यांच्या दराने व्याज मिळते. एक वर्षांपासून 700 दिवसांपर्यंत मॅच्युअर होणार्‍या एफडीवर 8 टक्के दराने व्याज मिळेल.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक
या बँकेत 7 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.5 टक्के दराने व्याज मिळते. तर 91 दिवस ते 180 दिवस आणि 181 दिवसापासून 364 दिवसाच्या एफडीवर अनुक्रमे 5 टक्के आणि 5.75 टक्केच्या दराने व्याज मिळते. 365 दिवसापासून 729 दिवसात मॅच्युअर होणार्‍या एफडीवर 7.50 टक्केच्या दराने व्याज मिळते. 730

जना स्मॉल फायनान्स बँक
वरिष्ठ नागरिकांसाठी या बँकेत व्याजदर 11 ऑगस्टपासून लागू आहेत. येथे एफडीवर 4 ते 8 टकके दराने व्याज मिळत आहे, ज्यासाठी कालावधी 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत असेल. 2 ते 3 वर्षाच्या दरम्यान मॅच्युअर होण्यार्‍या एफडीवर ही बँक सर्वात जास्त व्याज देत आहे. या डिपॉझिट्समध्ये ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्केपर्यंतच्या दराने व्याज मिळते.